चीनमधील द्राक्ष निर्यात वाढवणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2018
Total Views |
 
 

मुंबई :  २०२० पर्यंत भारतीय द्राक्षांची चीनला होणारी निर्यात दुप्पट वाढेल, असा अंदाज कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणचे (अपेडा) अध्यक्ष पबन के बोरठाकूर यांनी व्यक्त केला.  अपेडातर्फे मुंबईत द्राक्ष प्रोत्साहन कार्यक्रम, विक्रेता आणि ग्राहक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी पबन के बोरठाकूर यांनी द्राक्ष निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अपेडातर्फे राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली.


चीनला होणारी भारतीय द्राक्षांची निर्यात ही सहाशे मेट्रिक टन इतकी आहे. चीनमध्ये निर्यात वाढवण्यासाठी अपेडाप्रयत्न करत आहे. ताज्या द्राक्षांची गुणवत्ता सुधारण्यासाठी अपेडाच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक राज्य आणि राष्ट्रीय संशोधन केंद्रासह वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय सामूहिक प्रयत्न करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रोत्साहनपर योजना भारतीय द्राक्षांच्या निर्यातीला आणखी चालना देतील, असे या कार्यक्रमात नमूद करण्यात आले. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत अपेडाकृषी उत्पादनांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. भारतातून द्राक्ष आयात करण्यासाठी चीन उत्सुक असल्याचे चीन अन्नपदार्थ आयात संघटनेचे झाँग लिशान यांनी यावेळी सांगितले.

 

या कार्यक्रमामुळे यावर्षीची निर्यात हजार मेट्रिक टनापर्यंत वाढून लवकरच दोन हजार मेट्रिक टनाचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. परदेशी व्यापार विभागाचे संयुक्त महासंचालक व्ही. चतुर्वेदी तसेच दोन्ही देशांचे या क्षेत्रातील प्रतिनिधी आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@