नव्या वर्षात या गाड्या महागणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : नवीन वर्षांत वाहन खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला अतिरिक्त खर्चाचा भूर्दंड बसू शकतो. वाहन कंपन्यांना उत्पादनात येणारा ज्यादा खर्च कंपन्या ग्राहकांकडून वसुल करत आहेत. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने भारतातील सर्व वाहन उत्पादनांच्या किंमतीत वाढ केली आहे.

 

फॉर्च्युनर, इनोव्हा, इटीयोस रेंज, कॉलोरा, लॅण्ड क्रूझर, प्रियुस, प्राडो आदी गाड्यांची किमतीत १ जानेवारीपासून वाढ होणार आहे. गेल्या काही काळात झालेले रुपयाचे अवमुल्यन आणि उत्पादनांच्या निर्मितीखर्चामध्ये झालेली वाढ यामुळे ही वाढ करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली.


 
 

कमोडीटी आणि परकिय चलनमुल्यातील वाढ याचा परिणाम उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तूंवर होत आहे. आत्तापर्यंत कंपनीने या अधिकचा खर्चाचा भार उचलला. मात्र, १ जानेवारीपासून ही रक्कम ग्राहकांकडून वसुल केली जाणार आहे. दरम्यान टोयोटा वाहन उत्पादक कंपनीने मार्च २०१८च्या तिमाहीत ९६५ कोटींचा नफा मिळवला होता. वाहन क्षेत्रात सलग नफा कमवणाऱ्या कंपनीपैकी एक म्हणून ही कंपनी गणली जाते. भारतात कंपनीच्या इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर या मॉडेलची सर्वाधिक मागणी आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहनविक्रीत घट झाली आहे. वाहन उत्पादन निर्मिती खर्चातही वाढ झाली आहे त्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती कंपनीने दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@