लाल रंग हा कसला...??

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2018   
Total Views |



तो लाल रंग हो कसला...

प्रेमाच्या उमललेल्या गुलाबाचा...

माझ्या घायाळ करणाऱ्या लालीचा...

की मग माझ्याच रक्ताचा...

अहो सांगा ना, तो लाल रंग हा कसला...

 

लडिवाळपणे आपल्या प्रियकरावर, पतीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेयसीची, पत्नीची ही आर्त हाक... हा प्रेमवीर तिच्या ओठांवरची लाली बघून तिच्या प्रेमात पडतो. प्रेमापोटी लालेलाल गुलाबांचा गुच्छच हाती टेकवतो. तीही मग लज्जेने लाल होते. प्रेमाच्या यालवलाली अगदी दोघंही आकंठ बुडून जातात. सगळं काही अगदी प्रेमाच्या लालसर रंगात न्हाऊन निघालेलं... पण, एक दिवस अचानक हाच प्रेमवीर तिच्या जीवावर उठतो. प्रेम वगैरे भावना खुन्शी रूप धारण करते अन् लालबुंद प्रेमाचं रूपांतर लाल रक्तात होतं. सगळं काही अगदी क्षणार्धात संपून जातं. आपला हक्काचा माणूस म्हणून ज्याच्या गळ्यात गळे घातले, तोच पुरुष या स्त्रीचा गळा कापतो. प्रेमाला तिलांजली वाहतो. हे सगळं घडण्यामागे विविध गोष्टी कारणीभूत ठरतात. अपेक्षाभंग, पुरुषी वर्चस्वाचा अहमगंड, संशयकल्लोळ आणि बरेच काही. याचाच अर्थ, तिच्या जवळचीच व्यक्ती बहुतांशी तिच्या खुनाच्या कटाची मास्टरमाईंड असते. गुन्हेगारीतील याच पैलूवर प्रकाश टाकणारा एक अहवाल युनोकडून नुकताच जाहीर करण्यात आला. या अहवालातही हीच बाब गांभीर्याने जगासमोर आली. निर्घृणपणे महिलांचे खून पाडणारे बाहेरचे कमी पण, घरातीलच पुरुष आढळून आले. या अहवालात भारतासंबंधी कुठलीही आकडेवारी दिलेली नसली तरी, अशा प्रकारांमध्ये आफ्रिका आणि अमेरिका खंडातील प्रकरणांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यामुळे या अहवालाचा उद्देश कुठेही महिलांमध्ये आपल्याच घरातील, मित्रपरिवारातील पुरुष मंडळींविषयी संशयाची, द्वेषाची भावना निर्माण करण्याचा नसून उलट महिलांना अधिक सतर्क, जागरूक राहण्याचा सल्ला देणारा आहे.

 

युनोच्या अहवालानुसार, २०१७ साली जगभरात महिलांच्या झालेल्या हत्यांमध्ये अर्ध्याहून अधिक हत्या केवळ त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबातील इतर पुरुष मंडळींनीच केल्याचे निष्पन्न झाले. हे प्रमाण आफ्रिकेत सर्वाधिक म्हणजे एक लाख स्त्रियांमध्ये . टक्के, अमेरिकेत . टक्के, आशिया खंडात . टक्के, तर युरोपमध्ये . टक्के इतके आहे. जगभरात महिला अत्याचाराविरोधी कडक कायदे केले असले तरी, त्यांच्या अंमलबजावणीविषयी युनोनेही साशंकता उपस्थित केली आहे. त्याचबरोबर सामान्य नागरिक, पोलीस यंत्रणांमध्ये अधिक समन्वयाची भूमिका अपेक्षित असल्याचेही हा अहवाल नमूद करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुरुषांची मानसिकता बदलण्याचा कायम दिला जाणारा सल्ला, ज्याकडे प्रामुख्याने कौटुंबिक पातळीवर दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे केवळ शालेय मूल्यशिक्षणात नाही, तर घरगुती स्तरावरही मुलांना मुलींविषयी आदर, त्यांच्याशी कसे बोलावे, कसे वागावे यासंबंधींचे समुपदेशन, मार्गदर्शन ही काळाची गरज आहे.

 

युनोच्या अहवालावरून एका गोष्टीवर शिक्कामोर्तब होते की, आपला देश असो अथवा परदेश, महिलांकडे बघण्याचा एकूणच दुय्यम दृष्टिकोन अजूनही बदलेलेला नाही. हा दृष्टिकोन बदलायचा असेल, तर सर्वप्रथम मुलांसमोर वावरणाऱ्या आईवडिलांनाच त्यांच्यातील संभाषण, देहबोली याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागेल. कारण, मुलांच्या वागणुकीवर घरातील वातावरणाचा सर्वाधिक प्रभाव असतो. सोबतच त्यांची संगत, त्यांचे शिक्षण, व्यसनांपासून चार हात लांब राहण्याची सवयदेखील महिलांकडे बघण्याचा त्यांचा एकूणच दृष्टिकोन निर्धारित करत असते. तेव्हा, घरी आपण मुलांसमोर कसे वागतो आणि कसे वागले पाहिजे, हे पालकांनी मनात ठामपणे रुजवले पाहिजे. त्याचा सकारात्मक परिणाम निश्चितच मुलांच्या वागणुकीवर दिसून येईल. केवळ घरातील मुलांनाच नव्हे, तर मुलींनाही स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे, ही हल्ली काळाची गरज आहे. त्याकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष देऊन प्रत्येक वेळी, घरात, घराबाहेर पालक मुलींची सुरक्षा करू शकत नाहीत, ही बाब ध्यानात घ्यावी. ‘आम्ही आमच्या मुलीचे रक्षण करण्यास समर्थ आहोत,’ या स्वप्नरंजनात त्यांनी रमून जाता कामा नये. मुलींनीही आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवता, सद्सद्विवेकबुद्धी सदैव जागरूक ठेवूनच आपल्या जोडीदाराची निवड करावी. त्यामुळे समाजातील ही अपप्रवृत्ती मुळापासून उखडून टाकायची असेल, तर पालकांपासून ते मुलामुलींपर्यंत सगळ्यांचीच मानसिकता बदलण्यापासून आता गत्यंतर नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@