शबरीमला मंदिर प्रवेश : रेहाना फातिमाला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2018
Total Views |



 
 
 
केरळ : शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या रेहाना फातिमाला अटक करण्यात आली आहे. पथनामथिट्टा पोलीसांनी तिला अटक केली. रेहाना फातिमा ही एक सामाजिक कार्यकर्ती आहे. तिच्यामुळे केरळमधील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे तिला अटक करण्यात आली. ऑक्टेबर महिन्यात रेहाना फातिमाने केरळ येथील शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. रेहानाच्या या प्रयत्नानंतर त्या ठिकाणी हिंसाचार घडला होता.
 

शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशाविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर रेहाना फातिमाने शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. तिथेच तिने ठिय्या मारला होता. परंतु गाभाऱ्यापासून ५०० मीटर अंतरावर तिला रोखण्यात आले. "मला अयप्पाचे दर्शन घ्यायचे आहे, मी सर्व धर्मांवर विश्वास ठेवते. आणि सर्व धर्मांचा आदर करते". असे रेहानाने म्हटले होते.

 

रेहानाच्या फेसबुक पोस्टमुळे तिला अटक करण्यात आली आहे. असे पोलीसांनी सांगितले. रेहानाच्या फेसबुक पोस्टमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. रेहाना फातिमा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने यापूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्ट या आक्रमक होत्या. पूर्वापार चालत आलेल्या अनेक परंपरांना रेहानाने आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यामातून विरोध केला होता. तिच्या फेसबुक पोस्टवरून तिचे आक्रमक विचार स्पष्ट होतात.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@