वेब चेक इन - शुल्कवाढीवरुन ‘इंडिगो’ जमिनीवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2018
Total Views |
 

मुंबई : विमान तिकीट बुकींग करताना वेब चेक इनवर शुल्क आकारणीच्या निर्णयावर टीका झाल्यानंतर इंडिगोकंपनीने हे शुल्क सर्वच जागांसाठी नसल्याचे स्पष्ट केले आहे. इंडिगोया विमान सेवा देणाऱ्या कंपनीने वेब-चेक-इनकरणाऱ्यांना शंभर ते आठशे रुपयांपर्यंत शुल्क आकारले होते. सोमवारी या निर्णयानंतर विमान कंपनीवर ग्राहकांनी टीका सुरू केली. ग्राहकांनी या प्रकरणी सरकारला लक्ष घालण्यास सांगितल्यानंतर कंपनीने लगेचच स्पष्टीकरण दिले आहे.

 

१४ नोव्हेंबर रोजी वेब-चेक-इनद्वारे जागा निवडणाऱ्या प्रवाशांना इंडिगोने अतिरिक्त शुल्क आकारले होते. दरम्यान या प्रकरणी एका प्रवाशाने ट्विटरद्वारे जाब विचारला. त्यावेळी कंपनीने वेब-चेक-इनच्या शुल्क आकारणीबाबत माहिती दिली. यानंतर रविवारी कंपनीने नव्या धोरणांची घोषणा केली. पहिल्या रांगेतील तिकिटांसाठी ८०० रुपये, आपत्कालीन खिडकीजवळील जागेसाठी ६०० रुपये, शेवटच्या रांगेत मधल्या जागेसाठी शंभर रुपये अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार असल्याची माहिती कंपनीने दिली. सोमवारी नेटिझन्सने कंपनीवर टीकेची झोड उठवली. सर्वात कमी दरात विमान सेवा, असा दावा करणाऱ्या कंपनीने अशा प्रकारे शुल्क आकारणी करणे कितपत योग्य आहे, असा सवालही विचारण्यात आला.

 
 
 

केंद्रीय उड्डाण मंत्रालयाला ट्विटद्वारे या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली. लवकरच या प्रकरणी भूमिका घेऊ, अशी प्रतिक्रीया मंत्रालयाने दिली होती. यानंतर खडबडून जागे झालेल्या इंडिगो एअरलाईन्सने सारवासारव करण्यास सुरुवात केली. वेब-चेक-इन केवळ काही जागांपुरताच मर्यादीत असून सर्वच तिकिटांसाठी आकारले जाणार आहे. जागेच्या उपलब्धतेनुसारच हे शुल्क आकारले जाणार आहे’, असे स्पष्टीकरण इंडिगो एअरलाईन्सने दिले. सोमवारी दुपारी इंडिगोने वेब-चेक-इन करणाऱ्या प्रवाशांना किमान शंभर रुपये शुल्क लागू केले आहे. प्रवाशांच्या पसंतीने जागा आरक्षित केली तर त्यावर शुल्क आकारले जाणार आहे. निवडक जागांसाठीच हे शुल्क असेल, असे कंपनीने स्पष्ट केले.

 

तोटा भरुन काढण्यासाठी उचलले पाऊल

वाढीव इंधन दर, रुपयाची डॉलरसमोरची घसरण याचा तोटा भरुन काढण्यासाठी इंडिगोने हा पर्याय स्वीकारल्याचे म्हटले आहे. जुलै-सप्टेंबर दरम्यान इंडिगोला ६५१ कोटींचा तोटा झाला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@