२६ /११ च्या दोषींना पकडण्यासाठी अमेरिकेकडून ३५ कोटींचे बक्षीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2018
Total Views |



 
 
 
वॉशिग्टन : २००८ साली मुंबईत झालेल्या २६/ ११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज १० वर्षे पूर्ण झाली. १० वर्षे उलटून गेली तरीदेखील या हल्ल्यातील दोषींवर कारवाई झालेली नाही. हा या हल्ल्यातील पीडितांचा अपमान आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने दिलेल्या प्रस्तावानुसार या हल्ल्याचे सूत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना पाकिस्तानने शिक्षा द्यायला हवी.
 

या सूत्रधारांना शिक्षा करणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी ही मागणी केली. तसेच या दोघांना पकडण्यासाठी अमेरिकेकडून बक्षिसाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यातील सूत्रधारांची माहिती देणाऱ्यांना अमेरिकेकडून ५० लाख डॉलर्स अर्थात ३५ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.

 
 

 
 

मुंबईत झालेल्या २६/११च्या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरून गेले होते. या हल्ल्यात ६ अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. आज या हल्ल्याला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांनी अमेरिकेच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी माइक पोम्पिओ म्हणाले की मी अमेरिका आणि अमेरिकेच्या सर्व नागरिकांच्या वतीने मुंबईकरांना बळ मिळावे अशी भावना व्यक्त करतो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@