घरावर कंटेनर कोसळून ३ जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2018
Total Views |



ठाणे : सोमवारी पहाटे मुंब्रा बायपास रस्त्यावर भीषण दुर्घटना घडली. चालकांचा ताबा सुटल्याने दोन कंटेनर रस्त्यालगतच्या घरावर कोसळले. यामध्ये घराचे चांगलेच नुकसान झाले आहे. या अपघातात भाग्यश्री आवटे (वय २७), दिनेश आवटे (वय ३) आणि कंटेनरचालक अब्दुल मना (२७) हे तिघे जखमी झाले. अपघातामुळे मुंब्रा बायपासवर चांगलीश वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या कंटेनर बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


@@AUTHORINFO_V1@@