समर्पण बुद्धीने केलेले काम म्हणजेच समाजसेवा : वसंत फाटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2018
Total Views |



डोंबिवली : “राष्ट्राच्या हितासाठी कुटुंब सोडून जेव्हा आपण समर्पण बुद्धीने, निष्ठेने काम करतो त्यास समाजसेवा म्हणतात,” असे मत रा. स्व. संघाचे शिक्षण प्रांत आयाम प्रमुख वसंत फाटक यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत जन कल्याण समितीच्या वतीने आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबिराच्या समारोपानिमित्त ते उपस्थित होते.

 

रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, याच धर्तीवर दि. २३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बौद्धिक वर्ग, मैदानी खेळ, संस्कार भारती रांगोळी, कचरा व्यवस्थापन, ब्रेन गेन तसेच ठश्यांच्या माध्यमातून शुभेच्छापत्र तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या निमित्ताने विद्यार्थ्यांना संघाचा इतिहास व चालू कामांची माहितीही या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आली. या शिबिरात सर्व वयोगटातील मुलांचा सहभाग होता.

 

रविवारी या शिबिराचा समारोप करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम प्रात्यक्षिके, युद्ध प्रात्यशिके तसेच योगाचे प्रकार मान्यवरांसमोर सादर केले. लेझीम प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन विवेक ताम्हणकर तर, युद्ध प्रात्यक्षिके किरण सावंत आणि योगा प्रात्यक्षिकाचे ज्योत्स्ना नाईक यांनी मार्गदर्शन केले. तसेच यानंतर विद्यार्थी, पालक व कार्यकर्त्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. यावेळी भाजप नगरसेवक संदीप पुराणिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी देशाला मोठे करण्यासाठी आपण आपल्या व्यक्तिमत्त्वातून मोठे असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी मंचावर कोकण प्रांत कार्यवाह अविनाश धाट, कल्याण जिल्हा कार्यवाह निलेश काळे व शिबीरप्रमुख नीता कुलकर्णी उपस्थित होत्या.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@