‘ही’ आहे माझी जात, मोदींचे काँग्रेसला प्रत्युत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2018
Total Views |



 
 
 
भिलवाडा : काँग्रेस नेते सी.पी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जात आणि धर्माविषयी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला आता पंतप्रधानांनी चांगलेच प्रत्युतर दिले आहे. “काँग्रेस पक्ष हा जातीयवादाला प्रोत्साहन देणारा पक्ष आहे. पंतप्रधानांची जात कोणती असा या पक्षाला प्रश्न पडावा? ज्यावेळी देशाचा पंतप्रधान परदेशात जातो. त्यावेळी देशातील ‘सव्वाशे कोटी भारतीय’ हीच त्याची जात असते.” असे चोख प्रत्युत्तर मोदींनी काँग्रेसला दिले.
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानमधील भिलवाडी येथील प्रसारसभेत बोलत होते. या सभेत त्यांनी जातीयवादाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. संविधान तयार करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील भेदभाव नष्ट करण्यासाठी मार्ग दाखवला. परंतु काँग्रेसचे नेते मात्र मोदींची जात कोणती असा प्रश्न विचारत आहेत. काँग्रेस हा जातीयवादाला प्रोत्साहन देणारा पक्ष आहे.” असे मोदी यावेळी म्हणाले.

 
 
 

तुम्ही चार पिढी देशावर राज्य केले. तुमच्या हाती सत्ता असताना देशातील ग्रामीण भागातील ४० टक्के घरांमध्येही शौचालय नव्हते. भाजपच्या सत्तेच्या काळात आज ग्रामीण भागात ९५ टक्के घरांमध्ये शौचालय आहेत. काँग्रेसने आपल्या सत्तेच्या काळात काम केले असते तर आज हिशोब दिला असता मात्र आज काँग्रेस जात कोणती?, वडील कोण? असे प्रश्न विचारत आहे. मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. मी गरीब आईला चुलीवर जेवण बनवताना पाहिले होते. त्यामुळेच मी सत्तेवर येताच देशातील ९० टक्के घरांमध्ये एलपीजी सिलेंडर पोहोचवले.” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@