चिदंबरम यांना ऐअरसेल-मॅक्सिस प्रकरणी झटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2018
Total Views |



नवी दिल्ली : सीबीआयने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार ऐअरसेल-मॅक्सिस घोटाळा प्रकरणात पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ति चिदंबरम यांच्याविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने या दोघांना दिलेल्या अंतरिम जमिनीची १८ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याचवेळी सीबीआयने कोर्टात स्पष्ट केले की या दोघांविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

 

पी. चिदंबरम यांच्याविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने एक पुरवणी चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये पी. चिदंबरम यांना आरोपी क्रमांक १ असे संबोधले गेले आहे. त्यांच्या समवेत इतर ८ जणांची नावे आहेत. एअरसेल मॅक्सिस खटल्यात पटियाला हाऊस कोर्टाने सोमवारी सुनावणी घेतली. याच प्रकरणात सीबीआयनेही वेगळी चार्जशीट दाखल केली आहे.

 

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यावर अर्थमंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. त्यांनी अर्थमंत्री असताना त्यांचा मुलगा कार्ति चिदंबरमला मदत केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला होता की, एअरसेल-मॅक्सिस करारामध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला होता. नियमांनुसार, अर्थमंत्री केवळ ६०० कोटी रुपयांच्या करारालाच मंजुरी देऊ शकतात. पण त्यांनी कॅबिनेट समितीची परवानगी न घेता ३५०० कोटी रुपयांचा करार केला होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@