धर्माच्या आधारे मुस्लिम आरक्षण नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2018
Total Views |
 
 

राज्य सरकारची स्पष्ट भूमिका 

 

मुंबई : धर्माच्या आधारावर मुस्लिम आरक्षण देता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सभागृहासमोर मांडली. आमदार शेख असिफ रफिक शेख यांनी सोमवारी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत दादा पाटील यांनी सरकारची भूमिका मांडली.

 

दरम्यान, धर्माच्या आधारावर मुस्लिम आरक्षण देता येणार नसल्याचे सरकार म्हणत आहे, परंतु, मुस्लीम समाजाला शैक्षणिक आरक्षण देता येईल, असे उच्च न्यायालयाने सांगितले असल्याचे शेख म्हणाले. तसेच मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात आले नाही, याबाबत सरकार काहीच का बोलत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आंध्र प्रदेश आणि केरळ सरकारने यापूर्वी धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण, तो टिकला नाही. कारण, संविधानामध्ये मुस्लीम समाजात जेवढ्या जाती आहेत, त्या सर्व जाती ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे चंद्रकांत दादा पाटील यांनी सभागृहासमोर सांगितले.

 

मुस्लीम समाजातील अन्य कोणत्या जातीचा ओबीसीमध्ये समावेश करायचा असल्यास त्याबाबत मागासवर्ग आयोगाकडे निवेदन देण्यात येईल. तसेच मागासवर्गीस आयोगाला या समाजाचा अभ्यास करुन त्यांचा ओबीसी वर्गात समावेश करण्याची मागणी करू, असेही पाटील म्हणाले. कोणत्याही राज्यात धर्माच्या आधारावर देण्यात आलेले आरक्षण टिकले नाही.त्यामुळे धर्माच्या आधारावर मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात येणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@