छत्तीसगडमध्ये आठ नक्षलवादी ठार, दोन जवान शहिद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2018
Total Views |
 

सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा या नक्षलग्रस्त भागात सोमवारी भारतीय जवान आणि नक्षली यांच्यात चकमक झाली. यात आठ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. मात्र, दोन जवान शहीद झाले आहेत. सुकमा जिल्ह्यातील किस्ताराम येथील जंगल परिसरात सकाळी आठ वाजता ही चकमक झाली.

 

सकाळी सुरक्षा रक्षक गस्तीवर असताना अचानक गोळीबार सुरू झाला. सुरक्षा रक्षकांनी आठ जवानांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. सुकुमा जिल्ह्यातील किस्ताराम येथील जंगल परिसरात केलेल्या डीआरजी आणि एसटीएफ यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

 

सकलापूर गावात हे नक्षलवादी लपून बसले होते. या ठिकाणी अजूनही तणाव असल्याची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यातील चिंतागुफा या भागात सुरक्षारक्षक आणि नक्षलींमध्ये चकमक झाली होती. यात एकाला अटक करण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@