६५ हजार पेट्रोल पंपांचे वाटप होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2018
Total Views |


नवी दिल्ली : तुम्ही जर बारावी पास असाल आणि नविन उद्योगाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. काही नियमांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला पेट्रोल पंपाची एजन्सी मिळू शकते. देशात २०१९च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी तब्बल ६५ हजार पेट्रोल पंपांचे वाटप केले जाणार आहे. सार्वजनिक तेल कंपन्यांनी ही योजना आखली असून पेट्रोल पंपांची संख्या दुप्पट करण्याचा मानस आखला आहे. तेल कंपन्यांनी यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कंपन्यांच्या नियमांची पूर्तता केल्यास तुम्ही पेट्रोल पंपाचे मालक होऊ शकता.

 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांनी रविवारी देशभरात ५५ हजार ६४९ पेट्रोल पंपांच्या स्थापनेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. सध्या काही राज्यांत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने काही राज्ये वगळण्यात आली आहेत. त्यामुळे या राज्यांतही काही काळानंतर पेट्रोल पंपांसाठी जाहिरात निघू शकते. सध्या, राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि मिझोरम राज्यांत निवडणुका होत आहेत. त्यामुळे या राज्यातील विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होताच, येथील पेट्रोल पंपांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

 

पात्रतेसाठी अटी

 

नवीन पेट्रोल पंपांच्या जागा मालकासाठी १२ वीपर्यंत शैक्षणिक अर्हता ठेवली आहे. यापूर्वी ही अट दहावी होती. सध्या देशभरात ६३ हजार ६७४ पेट्रोल पंप आहेत. त्यामध्ये सर्वाधिक पंप हे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे आहेत. तर खासगी क्षेत्रात नायरा एनर्जी लिमिटेड कंपनीचे सर्वाधिक हजार ८९५ पेट्रोल पंप आहेत.

 

अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://vendor.hpcl.co.in/dealeradv4retail/index_apply.jsp

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@