‘मन की बात’ या तुमच्याच भावना : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळल्यापासून मन की बात या कार्यक्रमाचे एकूण ५० भाग पूर्ण झाल्याबद्दल रविवारी नरेंद्र मोदींनी देशवासीयांचे अभिनंदन केले. यावेळी भावोद्गार काढताना, मन की बात'मध्ये आवाज फक्त माझा आहे. भावना माझ्या देशवासीयाच्या आहेत.”, असे ते म्हणाले.

 

दिनांक २५ नोव्हेंबरच्या ५०व्या भागात पंतप्रधान मोदींनी संविधान दिवस, गुरुनानक जयंतीशी संबंधित महत्त्वपूर्ण बाबींवर देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, दिनांक ऑक्टोबर २०१४ रोजी 'मन की बात' कार्यक्रम सुरू झाला. ५० भागांपर्यंतचा प्रवास हा आपण सर्वांनी मिळून पूर्ण केला आहे. आकाशवाणीनेही या कार्यक्रमाचे सर्वेक्षण केले आहे. जवळपास ७० टक्के लोक नियमितपणे 'मन की बात' कार्यक्रम ऐकत आहेत. या कार्यक्रमामुळे समाजात सकारात्मकपणा आला आहे. अनेकांनी आपले अनुभव सांगितले आहेत. 'मन की बात' कार्यक्रमामुळे रेडिओ हे माध्यमही लोकप्रिय होत आहे. याचा मला आनंद आहे, अशी भावना मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

 

विविध प्रादेशिक भाषेत 'मन की बात' कार्यक्रम प्रसारीत करणाऱ्या आकाशवाणीतील कर्मचाऱ्यांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. काही कर्मचारी प्रादेशिक भाषेत माझ्या आवाजात 'मन की बात' सादर करतात. तेव्हा ३० मिनिटांसाठी ते स्वत: मोदी झालेले असतात. मी या सगळ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानत असल्याचे मोदींनी सांगितले.

 

संविधान सभेबद्दल आदर
 

'संविधान दिवस' दिवसाचा उल्लेख करताना नरेंद्र मोदी यांनी संविधान सभेबद्दल आदर व्यक्त केला. संविधान सभेत देशातील महान व्यक्तीमत्त्वांचा समावेश होता. तीन वर्षात संविधान सभेने व्यापक, विस्तृत संविधानाची निर्मिती केली. संविधानात अधिकार आणि कर्तव्य यांच्याबाबत अधिक सविस्तरपणे असून अधिक स्पष्टपणे नमूद केल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@