“माझ्या आईला राजकारणात का खेचता?”

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2018
Total Views |


 
 

छतरपूर : राज बब्बर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाला उत्तर देत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. “माझ्या आईला राजकारणात का खेचता? माझ्याशी लढण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही. म्हणूनच ते माझ्या आईला राजकारणात ओढत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. “रुपयाचे अवमूल्यन होत असून, त्याचे मूल्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या वयाच्या जवळपास पोहोचले आहे, असे आक्षेपार्ह्य विधान काँग्रेस नेते राज बब्बर यांनी केले होते.

 

मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदींनी छतरपूरमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी राज बब्बर यांच्या त्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. “जनतेने मुख्यमंत्री शिवराज सिंग यांना 'मामा' संबोधलेल काँग्रेसच्या नेत्यांना आवडत नाही. मग ते आपल्या एंडरसन आणि क्वात्रोची मामांबद्दल का बोलत नाहीत? या मामांपैकी एकाशी संगनमत करून बोफोर्स घोटाळा केला तर भोपाळ गॅस दुर्घटनेतील आरोपी एंडरसनला विशेष विमानाने देशाबाहेर पाठवले.” असा टोलाही पंतप्रधांनी लगावला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@