मशीद उभाराल तर आत्मदहन करू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2018
Total Views |


 

नवी मुंबई : सानपाड्यातील एका संस्थेला मशीद उभारण्यासाठी देण्यात आलेला भूखंड रद्द करावा, यासाठी अखिल भारतीय सानपाडा रहिवासी महासंघाच्यावतीने दि. २७ नोव्हेंबर रोजी मुंबई पुणे महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच हा भूखंड रद्द केल्यास संघटनेच्या १४ सदस्यांनी प्रशासनाला आत्मदहनाचा इशारादेखील दिला आहेतंजीमुल मुस्लीम सोसायटीने मशीद उभारण्यासाठी २००१ सालापासून सिडकोकडे मागणी केली होती. सिडकोने सदर संस्थेला मशीदीसाठी भूखंड देण्यापूर्वी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस विभागाने खात्री करून ना हरकत प्रमाणपत्र देण्याची सुचना केली होती, अशी माहिती अखिल भारतीय सानपाडा रहिवासी महासंघाचे सदस्य संतोष पाचलग यांनी दै. मुंबई तरूण भारतशी बोलताना दिली. त्यानंतर जुलै २००८ साली स्थानिकांचा प्रखर विरोध असतानाही सेक्टर येथील भूखंडावर मशिद बांधण्यास परवानगी देण्यास हरकत नसल्याचा अहवाल देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

 
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने २०१२ सालापर्यंत पोलिसांनी सदरच्या भूखंड मशिद बांधण्यास हस्तांतरित करू नये असा अहवाल देण्यात आला होता. परंतु त्यानंतर सिडकोने हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. याच्या निषेधार्थ विरोधात २०१३ साली सुमारे हजार सानपाडावासियांनी सिडकोवर मोर्चा काढला होता. या वेळी राष्ट्रवादीचे माजी खासदार संजीव नाईक यांनी प्रशासन स्थानिक पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली होती. यात सदर मुस्लीम संघटनेने अन्य ठिकाणी भूखंड घेण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यानंतर तंजीमुल मुस्लीम सोसायटीने भूखंड मिळावा सिडको विरोधात न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, उच्च न्यायालयात सदर संस्थेच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे सिडकोने सदरचा भूखंड हस्तांतरित केल्याचे ते म्हणाले. दरम्यान, जनभावना लक्षात घेऊन सिडकोने बांधकामाला परवानगी देऊ नये, अशी विनंतीदेखील त्यांनी यावेळी केली. यासंदर्भात सानपाडा परिसरात अनेक ठिकाणी फलक लावण्यात आले असून नागरिकांमध्येही चर्चांना उधाण आले आहे. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होणार असले तरी या आंदोलनाला सर्व राजकीय पक्षाच्या सदस्यांनीदेखील पाठींबा दिल्याची माहिती काही सूत्रांकडून देण्यात आली.
 

आज या संदर्भात बैठक झाली. यासंदर्भात अधिक माहिती देता येणार नाही. परंतु मंगळवारी पोलिसांना बंदोबस्त लावण्यात येणार आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दखल घेतली जाईल.”

 

पी.एल.कुंभार,

पोलीस नाईक,

सानपाडा पोलीस स्थानक

 

“आम्ही कोणत्याही धर्माविरोधात नाही किंवा मशीद उभारण्यासाठीही आमचा विरोध नाही. यासंदर्भात आम्ही कमिश्नर, सिडकोचे अध्यक्ष . प्रशांत ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असून यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. जर यावर तोडगा निघाला नाही तर मंगळवारी मुंबई पुणे महामार्गावर चक्का जाम आंदोलन, सामुहिक मुंडन आणि १४ जण आत्मदहन करणार आहोत.”

 

संतोष पाचलग,

सदस्य, अखिल भारतीय सानपाडा रहिवासी महासंघ

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
@@AUTHORINFO_V1@@