कर्नाटकात भीषण अपघात; २५ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2018
Total Views |


 

बंगळुरू : कर्नाटकातील मांड्या येथे एक खासगी बस कालव्यात कोसळून मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेत २५ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून अनेक जण जखमी झाले आहेत. या खाजगी बसमध्ये एकूण ४० प्रवासाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य हाती घेतले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पांडवपुरा तालुक्याजवळ असलेल्या कावेरी नदीला जोडणाऱ्या कालव्यात भरधाव येणारी खाजगी बस कोसळली. भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे कर्नाटकचे उप मुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी सांगितले. मृतांमध्ये ५ लहान मुलांसह महिलांचा आकडा जास्त असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

यातील जवळपास १२ प्रवाशांनी बसमधून उद्या मारून आपला जीव वाचवला आहे. तर एका लहान मुलाला वाचवण्यात बचावपथकाला यश आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेची दाखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@