काँग्रेस नेत्याने काढली मोदींची जात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2018
Total Views |



सी. पी. जोशी म्हणाले, 'हिंदू धर्माविषयी बोलण्याचा अधिकार फक्त पंडितांना'

 

जयपुर : राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस नेते सी. पी. जोशी यांनी बेताल वक्तव केलं आहे. आपल्या नाथद्वारा या मतदार संघात एका प्रचार सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उमा भारती यांच्या जाती आणि धर्माविषयी वादग्रस्त विधान केले. जोशी यावेळी म्हणाले, "हिंदू धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त पंडितांना असून मोदी किंवा उमा भारतींना नाही."
 
 

काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री असलेले सी. पी. जोशी हे नाथद्वारा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. प्रचाराला काही तास उरले असताना एका प्रचार सभेत जोशी म्हणाले, "उमा भारती कोणत्या जातीच्या हे कोणाला माहिती आहे का? ऋतंभरा यांची जात कोणाला माहित आहे का? या देशामध्ये हिंदू धर्माविषयी बोलण्याचा अधिकार फक्त फक्त पंडितांना आहे. आपल्या देशात अजबच होतंय. उमा भारती लोधी समाजाच्या, त्या हिंदू धर्मावर बोलतात. साध्वीजी कोणत्या धर्माच्या, त्या हिंदू धर्मावर बोलतात. नरेंद्र मोदींचा धर्म कोणता आणि ते हिंदू धर्माविषयी बोलतात."

 

जोशींचा माफीनामा

 

जोशींच्या वादग्रस्त प्रकारानंतर सर्वच स्थरातून टीका झाल्यानंतर जोशी यांनी माफीनामा जाहीर केला. यात ते म्हणले, "काँग्रेस पक्षाचे आदर्श आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो."

 

काँग्रेस नेत्यांना राहुल गांधींचा आदेश

सी पी जोशी यांच्या वादग्रस्त विधानानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना तंबी दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ते म्हणाले, "सी पी जोशी यांचे विधान हे काँग्रेस पक्षाच्या आदर्शांविरोधात आहे. पक्षाच्या नेत्यांनी समाजाच्या भावना दुखावतील असे विधान करु नये. काँग्रेस पक्षाचे आदर्श आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून जोशी यांना आपली चूक नक्कीच लक्षात येईल. याविषयी त्यांनी माफी मागितली पाहिजे."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@