गुरू नानकांनी जगण्याची, अत्याचाराविरोधात लढण्याची प्रेरणा : भैय्याजी जोशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2018
Total Views |
 

फरीदाबाद :  श्री. गुरू नानक देव यांनी समाजाला आत्मसन्मानासह जगण्याची व अत्याचाराविरोधात संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. त्याचवेळी विदेशी आक्रमक बाबराला यमदूत ही संज्ञा देऊन, त्याने केलेल्या अत्याचाराची कठोर शब्दांत निंदा केली. जागरणाच्या व बलिदानाच्या निरंतर परंपरेत खालसाच्या संताने शिपायाच्या रुपात अवतार घेतला, ज्याने काबूल, कंधारपर्यंत आपले राज्य स्थापन करून विदेशी आक्रमकांचे रस्ते कायमसाठी बंद केले व देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली, अशा शब्दांत रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी गुरू नानक यांना अभिवादन केले.

 

गुरू नानक देव महाराज यांच्या ५५० व्या जयंती वर्षप्रारंभानिमित्त भैय्याजी जोशी यांनी नानक देवांना वंदन केले. यावेळी भैय्याजी म्हणाले की, श्री. गुरू नानक देव महाराजांचे हे ५५० वे प्रकाश वर्ष कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सुरू होत आहे आणि हे वर्ष आपल्या आयुष्यात आले आहे, हे आपले मोठे सौभाग्य आहे. गुरू महाराजांनी आपल्या जीवनकालात जवळपास ४५ हजार किमीची यात्रा केली. हिमालयापासून श्रीलंकेपर्यंत, मक्का-मदिना, ताश्कंद, इराण, इराकपासून तिबेट, अरुणाचल प्रदेशातील हिमाच्छादित पर्वतराजी, बांग्लादेशपर्यंत यात्रा करून तत्कालीन धार्मिक व सामाजिक नेतृत्वांशी संवाद साधून त्यावेळच्या समाजाला विखुरणार्‍या आणि अंधविश्‍वासाचे रूप घेऊन त्याला कमकुवत करणार्‍या अंध रुढींमधून बाहेर पडून भारताची आध्यात्मिक परंपरा पुढे नेली. त्या परंपरांना जीवनातील पुरुषार्थ व परमार्थाची प्रेरणा देऊन प्रभूस्मरणाशी जोडले. किरत करो, नाम करो, वंड छको’ (मेहनत करा, नामस्मरण करा, वाटून खा) असा संदेश दिला, जो वर्तमान संदर्भातही तितकेच प्रासंगिक ठरतो, असे मत भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.

 

गुरू नानक यांनी समाजाला आत्मसन्मानासह जगण्याची व अत्याचाराविरोधात संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. त्याचवेळी विदेशी आक्रमक बाबराला यमदूत ही संज्ञा देऊन, त्याने केलेल्या अत्याचाराची कठोर शब्दांत निंदा केली, असेही प्रतिपादन जोशी यांनी केले. भैय्याजी पुढे म्हणाले की, दहशतीच्या काळातही नश्‍वर देहाची चिंता न करता आपण सत्यच बोलणार आहोत व हिंदुस्थान निश्‍चितच स्वतःला सांभाळून घेईल असे आव्हान गुरू नानक यांनी दिले. जागरणाच्या व बलिदानाच्या निरंतर परंपरेत खालसाच्या संताने शिपायाच्या रुपात अवतार घेतला, ज्याने काबूल, कंधारपर्यंत आपले राज्य स्थापन करून विदेशी आक्रमकांचे रस्ते कायमसाठी बंद केले व देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे भैय्याजी म्हणाले.

 

आज सारा समाज पैशांसाठी आंधळी स्पर्धा व पापाचार यात फसला आहे. गुरु महाराज म्हणत, पापाशिवाय अधिक माया गोळा करता येत नाही आणि मृत्यूसमयी सोबत घेऊनही जाता येत नाही. केवळ आत्ममोक्षासाठी नव्हे तर, समाजाच्या उद्धाराचेही कार्य करायचे असल्याचे ते म्हणाले होते. महाराजांनी प्रत्येक विचारप्रवाह व कार्यबलासाठी सात्विक व उच्च जीवन जगण्याचा मार्ग सुचवला होता जो आजही लागू असल्याचे मत भैय्याजी यांनी केले. याचसोबत गुरू नानक यांच्या या प्रकाशवर्षाचा आधार घेऊन या संपूर्ण वर्षात बालक, युवा, उद्यमी, किसान, विद्वान यांमध्ये त्यांच्या उपदेशाचा प्रसार होऊ शकेल असे आयोजनव्हावे, असेही आवाहन भैय्याजी जोशी यांनी यावेळी केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@