व्हॉटस्पअॅपवर ‘ब्लॅक फ्रायडे सेल’ : डेटा ‘हॅक’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2018
Total Views |
 

मुंबई : तुम्हालाही आलाय ब्लॅक फ्रायडे सेल किंवा ब्लॅक फ्रायडे कॉन्टेस्ट असा मेसेज तर वेळीच सावध व्हा. व्हॉटसअॅपवर ब्लॅक फ्रायडे सेलच्या नावे डेटाचोरीचे प्रकार जगभरात सुरू आहेत. अशा नावाने एखाद्या ग्रुपवर किंवा मेसेजद्वारे पाठवण्यात आलेली लिंक ओपन केल्यास तुम्हीही या हॅकरचे शिकार होऊ शकता.

 

गेल्या काही दिवसांपासून 'ब्लॅक फ्रायडे' नावाचा एक मेसेज सर्व ग्रुपवर व्हायरल होत आहे. बड्या ऑनलाईन सेलिंग कंपन्यांच्या नावे एक लिंक सध्या 'व्हॉटसअॅप'वर फिरत आहे. त्यात मोठ्या ब्रॅण्डची उत्पादने ९० टक्के ऑफरचे प्रलोभन दिले जात आहे. ही ऑफर मिळवण्यासाठी त्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. त्यानंतर एक फेक ऑनलाईन वेबसाईट उघडते. त्यात 'डेबिट' किंवा 'क्रेडीट' कार्डची माहिती मागितली जाते. तुम्ही माहिती दिल्यास तुमच्या खात्यातील रक्कमेचा अपहार होऊ शकतो.

 

'ब्लॅक फ्रायडे' हा दिवस 'शॉपिंग' 'डिस्काऊंट'साठी ओळखला जातो. त्यामुळे ग्राहक डोळेझाक करत यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे अशा फसवणूकीपासून सावध राहा आणि ऑनलाईन शॉपिंग करताना अधिकृत संकेतस्थळांनाच भेट द्या. आत्तापर्यंत इंग्लड, आयरलॅण्ड, अमेरिका आदी देशातील 'व्हॉटसअॅप युझर्स'ला याचा फटका बसला आहे. दरम्यान भारतातही अशा फसवणूक करणाऱ्या वेबसाईटचे प्रमाण वाढत आहे. याद्वारे ग्राहकांचा डेटा हॅक करुन लाखोंचा गंडा घातला जातो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@