हा उमेदवार करतोय चप्पल वाटून प्रचार !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2018
Total Views |
 

हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणूकांचा प्रचार सध्या चांगलाच जोर धरत आहे. प्रत्येक पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर कुणी रॅली, भाषणे, घोषणाबाजी आणि ऑनलाईन प्रचाराद्वारे सध्या मतदारांना मतांसाठी आवाहन करत आहेत. या दरम्यान एका उमेदवाराची चर्चा सध्या निवडणूकीच्या आखाड्यात चांगलीच रंगली आहे. मी निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली नाही तर जोड्याने हाणा, असा प्रचार हा पठ्ठा करत आहे. त्यासाठी स्वतःच मतदारांना चप्पल वाटत फिरत आहे.

 

अकुला हनुमंत जगतियाल, असे त्यांचे नाव आहे. तेलंगणातील कोरातला येथून निवडणूक अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. कोणत्याही पक्षाच्या चिन्हाशिवाय ते निवडणुक लढवणार आहेत. सध्या ते दिवसभर प्रचारात व्यस्त आहेत. मतदार संघातल्या प्रत्येक घरात जाऊन ते घोषणापत्र देतात. त्यासोबत एक चप्पलही मतदारांना देत आहेत.

 

घोषणापत्रातील सर्व आश्वासनांची नक्कीच पूर्तता करू, असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला आहे. मात्र, निवडणूक लढवून आणल्यावर जर आम्ही ही आश्वासने पूर्ण केली नाहीत तर आम्हाला हेच जोडे फेकून मारा असा प्रचारही ते करत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@