कच्च्या तेलाचे दर वर्षभराच्या निचांकावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2018
Total Views |
 
 

मुंबई : इंधनदरात एक दिवसापूर्वी स्थिरता दिसल्यानंतर शुक्रवारी पुन्हा कच्च्या तेलाच्या दरात घसरणीचे सत्र कायम राहिले. कच्च्या तेलाचे दर वर्षभरातील निच्चांका पोहोचल्याने पेट्रोल डिझेलच्या किमतीत पुन्हा घसरण नोंदवण्यात आली.

 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ६२ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचल्या. गेल्या वर्षभरातील ही सर्वाधिक घसरण आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या घसरणाऱ्या किमतींचा थेट परिणाम तेल कंपन्याच्या शेअरवर पडत आहे. शुक्रवारी नवी दिल्लीत पेट्रोलच्या किमती ४० पैशांनी कमी होऊन ७५.५७ रुपयांवर आले.

 

मुंबईही ४० पैशांनी दर घसरुन ८१.१० पैशांवर पोहोचले. दिल्लीत डिझेलचे दर ४१ पैसे तर मुंबईत ४३ पैशांनी घसरले. दिल्लीत डिझेलचे दर ७०.५६ तर मुंबईत ७३.९१ रुपयांवर पोहोचले. तेल कंपन्यांनी दिल्ली, कोलकत्ता, मुंबई आदी प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये ४० ते ४४ पैशांपर्यंत कपात केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@