भारताला लाभली चित्रपटांची समृद्ध परंपरा : चीन हान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2018
Total Views |



पणजी : “भारत हे प्रतिभावंतांचे भांडार असून भारताला चित्रपटांची समृद्ध परंपरा लाभली आहे. भारतीय चित्रपटांच्या कथानकाविषयी मला औत्सुक्य आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतले थोर चित्रपट निर्माते सत्यजीत रे यांच्यापासून मी स्फूर्ती घेतली आहे.” अशा भावना हॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चीन हान यांनी व्यक्त केल्या. गोव्यामध्ये सुरु असलेल्या ४९व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

सिंगापूरमधला नाट्य आणि चित्रपट उद्योग ते हॉलीवूड हा माझा प्रवास अनेक रोमांचक घटनाक्रमांनी युक्त आहे. माझे प्राथमिक शिक्षण रंगभूमीवर झाले. रंगभूमी ही अशी जागा आहे जिथे आपल्याला नृत्य, सादरीकरण, आवाजतले चढ-उतार याविषयी बरच काही शिकायला मिळते.” असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच ते पुढे म्हणाले की, “भारतीय चित्रपटांचा मी मोठा प्रशंसक असून 'दंगल' हा जगभरात प्रसिद्ध असलेला सिनेमा मी नुकताच पहिला.”

 

जग अधिक जवळ येत असून विविध वंशाच्या लोकांचे चित्रपट दाखवण्यासाठी अधिकाधिक व्यासपीठ उपलब्ध होत आहेत अशा वेळी जागतिक कथानकाचा भाग होण्यासाठी आशियाई अभिनेत्यांना मोठी संधी आहे. इरफान खानसारख्या अभिनेत्यांनी अमेरिकेत स्थान प्राप्त केले आहे. त्याचप्रमाणे अनेक आशियाई अभिनेते आज जगात लोकप्रिय झाले आहेत. अभिनेत्यांसाठी हॉलीवूड हे अंतिम स्थान नाही, मात्र ते महत्वाचे स्थान निश्चितच आहे.” असे ते म्हणाले. तसेच भारतातल्या चित्रपट उद्योगाविषयी तसेच दूरचित्रवाणी माध्यमाविषयी आणखी जाणून घ्यायची इच्छा आहे, असे चीन हान यांनी सांगितले.

 

कोण आहेत चीन हान?

 

चीन हान हे सिंगापूर- अमेरिकन अभिनेते आहेत. गेली २० वर्ष ते अमेरिकेतील नाटक, टीव्ही आणि चित्रपट आशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेते म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी हॉलीवूडमधल्या अनेक सुप्रसिद्ध चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. 'बॅटमॅन' सिरींजमधल्या 'दि डार्क नाइट', '२०१२', कॅप्टन अमेरिका- विंटर सोल्जर' आणि 'इंडिपेडन्स डे भाग २' यामधल्या त्यांच्या छोट्या पण महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@