म्हणे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पेक्षा उंच इमारत बांधू!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2018
Total Views |
 

चंद्रबाबूंच्या कुरापती सुरूच  

 

हैद्राबाद : भाजपप्रणीत रालोआमधून बाहेर पडल्यापासून भाजपविरोधासाठी जंग जंग पछाडत असलेले आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आतास्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षाही उंच इमारत बांधण्याचा निर्णय घेत भाजपवर अप्रत्यक्षरित्या आणखी एक कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. नुकताच त्यांनी आंध्रप्रदेशमध्ये केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयला प्रवेशबंदी करण्याचा धक्कदायक निर्णय घेतला होता.

 

आंध्र प्रदेश राज्यातून तेलंगणचे विभाजन केल्यानंतर आंध्रची नवी राजधानी अमरावती येथे उभारण्यात येत आहे. येथे राज्याच्या विधानभवनाची इमारत उभारण्यात येणार असून या इमारतीची उंची ही नुकत्याच लोकार्पण करण्यात आलेल्यास्टॅच्यू ऑफ युनिटीअर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या उंचीपेक्षाही जास्त असणार आहे. आंध्रमधील काही स्थानिक इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यानुसार, अमरावती येथे उभारण्यात विधानभवनाची उंची सुमारे २५० मीटर इतकी असणार आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची १८२ मीटर इतकी आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस यासंदर्भातील निविदा काढण्यात येणार असून त्यानंतर पुढील दोन वर्षात इमारतीचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

 

सीबीआयला राज्यात कोणत्याही प्रकरणाच्या तपासासाठी मुक्त प्रवेशाचा सर्वाधिकार काढून टाकण्याचा धक्कादायक निर्णय मुख्यमंत्री नायडू यांनी नुकताच घेतला होता. या निर्णयावरून त्यांच्यावर बरीच टीकाही करण्यात आली होती. त्यानंतर आता नायडू यांनी अप्रत्यक्षरित्या पुतळे आणि इमारत यांच्या उंचीवरून स्पर्धा सुरू केली असल्याचे म्हटले जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@