एटीएम वापरताना काळजी घ्या, अन्यथा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2018
Total Views |


 


बँकेतून पैसे काढायचे म्हणजे खातेधारकांसाठी वेळखाऊ प्रक्रिया पार पाडावी लागते. परंतु एटीएम अर्थात ऑटोमेटेड टेलर मशिन आल्यापासून पैसे काढणे व टाकणे अतिशय सहज आणि जलद झाले आहे. विशेषतः नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराला मोठी चालना मिळाली. यात एटीएमचा सर्वात जास्त वापर वाढला. मात्र एटीएमही बँकिंग प्रणाली सर्वात चांगली सुविधा असली तरी एटीएमधारकाच्या निष्काळजीपणा, अज्ञानामुळे एटीएमची सुविधा ग्राहकांसाठी धोकादायक ठरू शकते. यासाठी एटीएम वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यावयाची त्याबद्दल जाणून घेऊ...

 

डेबिट अथवा क्रेडिट कार्डाचा पासवर्ड वेळोवेळी बदला.

 

 

तुमच्या खात्यावर अथवा कार्डशी संबंधित कोणताही संशयास्पद व्यवहार वा सूचना वाटल्यास बँकेला त्वरित त्याची सूचना द्या.
 
 
 

 

एटीएममधील व्यवहार झाल्यानंतर येणारी पावती काढून स्वत: जवळ ठेवा अथवा नष्ट करा. मात्र ती मशीनमध्ये तशीच सोडून जाऊ नका.
 
 

 

दुकानात कार्ड स्वाईप करताना आपल्या कार्डाचा पिन स्वत: च मशीनवर टाका. दुकानदाराला सांगू नका.
 
 
 
 
तुमची आर्थिक माहिती वा तपशील ई-मेल, फोन अथवा मेसेजद्वारे कोणालाही कळवू नका.
 
 
 

शक्यतो तुमचे कार्ड ज्या बँकेचे आहे, त्याच बँकेच्या एटीएमचा वापर करा. अन्य बँकांच्या एटीएम यंत्राचा वापर करताना आपल्या नकळत आपली माहिती त्रयस्थ बँकेकडे जमा होत असते.

 
 

तुम्ही इंटरनेटवरील व्यवहारांसाठी कार्डचा वापर करत असाल तर, आपल्या संगणकावरील अँटिव्हायरस अद्ययावत करून घ्या. तुमचा संगणकही नियमितपणे अपडेट करा.

 
 
 

आर्थिक आमीषे, प्रलोभने अथवा जाहिराती असलेले ई-मेल शक्यतो ओपन करू नका. तुमचे खाते असलेल्या बँकांकडून येणारे मेल्स वगळता अन्य बँकांच्या ई-मेलला प्रतिसाद देऊ नका.

 
 
 

तुमचे परदेशात जाणे-येणे अजिबात होत नसेल तर, आपल्या बँकेला फोन करून कळवा, परदेशांतील कार्डचा अ‍ॅक्सेसपूर्णपणे बंद करून टाका. ज्या वेळी तुम्हाला परदेशात जायची वेळ येईल, तेव्हा तुम्ही हे निर्बंध ठरावीक काळापुरते हटवण्याची सूचना बँकेला करू शकता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@