धक्कादायक; २५ मुलांचे धर्मपरिवर्तन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2018
Total Views |



हरियाणातील अंबाला शहरातील घटना


हरियाणा : अंबाला शहरात परवानगीशिवाय चालू असलेल्या मर्सी होमधून २५ मुलांची सुटका केली आहे. मुलांचे धर्म परिवर्तन करून त्यांच्या नावामागे मसीह लावण्यात आल्याचा आरोप डॉ. फिलीप लाल मसीह याच्या मर्सी होमवर लावण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बलजीत कौर यांच्या नेतृत्वखाली पुलिस, डीसीपीओ आणि सीडब्ल्यूसीच्या पथकांनी ही संयुक्त कारवाई केली.

 

मुलांची सुटका करत असताना मर्सी होमचे संचालक व मुलांनी अधिकाऱ्यांना विरोध केला. एका लहान मुलीने एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे डॉ. फिलीप याच्यावर मुलांचा ब्रेन वॉश केल्याचा आरोप लावला आहे. तसेच कारवाई करत असताना मिळालेल्या कागदपत्रांमध्ये मुलांचे धर्मपरिवर्तन केल्याचा पुरावा मिळाल्याचे तपास अधिकारी कौर यांनी सांगितले.

 

मुलांची सुटका केल्यानंतर कैंट येथील सरकारी दवाखान्यात १३ मुली व १२ मुलांची तपासणी करून पंचकूला आणि यमुनानगर येथील वसतिगृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, संस्थेच्या नोंदणीची फाईल अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र सीडब्ल्यूसी आणि डीसीपीओ अधिकाऱ्यांनी संस्थेच्या नोंदणीची फाईलवर मुद्दामहून सही केली नसल्याचा आरोप मर्सी होमचे संचालक डॉ. फिलीप लाल मसीह याने केला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@