फोन हरवलाय? आता चिंता सोडा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2018
Total Views |


 

गुगलचे Find My Device हे फीचर झाले अपडेट


मुंबई : आजच्या युगात फोन हा सर्वांचा अविभाज्य घटक बनला आहे. एक तास जरी फोनपासून लांब राहिलं तरी जीव कासावीस होतो. अशात फोन हरवला किंवा चोरीला गेला तर मग विचारूच नका. अशावेळी पृथ्वी डोक्यावर घेतली जाते. पोलिसांकडे तक्रार दाखल देखील काही फायदा होत नाही. मात्र आता अशावेळी गुगल तुमच्या मदतीला धावून येणार आहे. गुगलने आपल्या Find My Device या फीचरमध्ये बदल केले असून यात एक नवीन फिचर ॲड केले आहे. यामुळे तुमचा हरवलेला फोन अगदी सहज मिळू शकतो.

 

गुगलच्या Find My Device या फीचरने तुमचा फोनचे शेवटचे लोकेशन काय आहे? याचा शोध घेता येतो. गुगलच्या याच बहुउपयोगी फीचर अपडेट झाले असून 'इंडोर मॅप्स' हे नवे फिचर ॲड केले आहे. या नवीन अपडेटमुळे युजरला निवडक इमारती, मॉल्स, विमानतळ अशा ठिकाणांचे इंडोर व्यू पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तुमचा फोन तुम्ही सहज मिळवू शकता. गुगल प्ले स्टोअरवर हे अप्लिकेशन उपलब्ध असले तरी गुगलने याबाबाद अद्याप अधिकृत माहिती दिली नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@