मुरादाबादमध्ये तयार होतेय 'पंचतारांकित गोशाळा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2018
Total Views |


 

 
 
उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली पंचतारांकित गोशाळा मुरादाबाद शहरातील लाकरी या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. सर्व सोयी-सुविधायुक्त असलेल्या या गोशाळेमध्ये ३५० गायी व १५० वासरांचे संगोपन करता येणार आहे. यासाठी जवळपास २ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या गोशाळेच्या आराखड्याला मुख्य पशुधन अधिकारी बी. के. गुप्ता यांनी मंजुरी दिली आहे.
 

या गोशाळेमध्ये गायींसाठी बसण्यासाठी, झोपण्यासाठी, फिरण्यासाठी वेगवेगळे विभाग बनवले जाणार आहेत. त्याचबरोबर चारा-पाणी, शेण व गोमुत्रासाठी वेगवेगळे फिल्टरेशन प्लांटदेखील बनवण्यात येणार आहे. यासाठी मुरादाबाद येथील आर्किटेक्ट विनायक गुप्ता यांनी आराखडा तयार केला असून यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता भटक्या गायींना संरक्षण मिळणार आहे.

 

प्री इंजीनियर्ड बिल्डिंग टिनशेड पासून बनवण्यात येणाऱ्या या गोशाळेमधील गायींचा उन्हाळा, हिवाळा व पावसाळ्यापासून बचाव होणार आहे. तसेच गायींना धुण्यासाठी गोशाळेमध्येच स्प्रिंगलर लावण्यात येणार आहे. गायींना गार आणि गरम हवा मिळवण्यासाठी आतमध्ये पंखे देखील बसविण्यात येणार आहेत.

 

गोशाळेतील असणाऱ्या गायींच्या शेणापासून वीज तयार केली जाणार असल्याची देखील माहिती देण्यात आली. या विजेचा वापर गोशाळेमध्ये करण्यात येणार असून उरलेली वीज आजूबाजूच्या परिसराला वितरित केली जाणार आहे. लवकरच या गोशाळेचे काम सुरु करण्यात येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@