शेअरबाजारात घसरणीने आठवड्याची सांगता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2018
Total Views |
 

मुंबई : आठवड्याच्या चौथ्या सत्रात गुरुवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २१९ अंशांनी घसरुन ३४ हजार ९८१ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १० हजार ५२६च्या स्तरावर बंद झाला.

 

गुरुवारी सकाळच्या सत्रात सुरुवातीला मजबूती दाखवत बाजार बुधवारच्या तुलनेत सावरत कामगिरी करत होता. रुपयाला डॉलरच्या तुलनेत मजबूती मिळाल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली. सेन्सेक्स गुरुवारी सकाळी ८२.५३ अंशांच्या मजबूतीसह ३५ हजार २८२ अंशांवर पोहोचला. निफ्टी १२ अंशांनी वधारुन १० हजार ६१२ वर कामगिरी करत होता. निफ्टीच्या मंचावर महिंद्रा एण्ड महिंद्राच्या शेअरमध्ये सर्वात जास्त घसरण झाली. बॅंकींग क्षेत्रात चौफेर नफेखोरी झाल्याने सर्वच शेअर घसरले. युनियन बॅंक, इंडियन बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, पीएनबी, एसबीआय आदी शेअर घसरले.

 

डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत असल्याचा फायदा बाजाराला होईल, असे संकेत शेअर बाजारातील दलालांनी दिले आहेत. रुपया मजबूत झाल्याने परकीय गुंतवणूकदारांचा ओढा वाढेल, अशी आशा व्यक्त केली आहे. आशियातील शेअर बाजाराचे सावट दोन्ही निर्देशांकावर असेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान गुरुनानक जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@