थंडीत सकाळचे कोवळे ऊन घ्याच! अन्यथा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2018
Total Views |



सध्या सर्वत्र हिवाळ्याची चाहूल लागली आहे. या दिवसात अनेक भागात मोठ्याप्रमाणात थंडी असते. थंडी म्हंटल की, मस्त दोन-चार कपडे अंगावर ओढून उशिरापर्यंत झोपणे. या दिवसांमध्ये साहसा कोणालाही लवकर उठायची इच्छा नसते. कारण बाहेरची भयंकर थंडी आपल्या शरीराला नको वाटते. आपल्या अशा या चुकीच्या सवयींमुळे आपले मोठे नुकसान करून घेत असतो. कारण थंडीच्या दिवसात आपल्याला शरीराला उष्णतेची गरज असते आणि हीच उष्णता आपल्याला सकाळच्या कोवळ्या उन्हामधून मोठ्याप्रमाणावर मिळत असते. असेच अनेक फायदे या उन्हामुळे आपल्या शरीराला होत असतात.

 

सकाळच्या कोवळ्या उन्हाचे फायदे आहेत तरी काय?

 

* सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळणार्‍या डी जीवनसत्त्वामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात.

 

* दररोज १० ते १५ मिनिटे काही वेळ उन्हात बसल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यामुळे तुमचा थंडीच्या दिवसात आजारापासून बचाव होऊ शकतो.

 

* हिवाळ्यात उद्भवणारे मुरुमे आणि त्वचेच्या संसर्गाची समस्या सकाळच्या कोवळ्या उन्हाने दूर होते.

 

* हृदयासंबधी विकारापासून बचाव करण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात अवश्य उभे राहावे.

 

* मधुमेहाचे रुग्ण तसेच संधिवात किंवा हाडांशी संबंधित कोणताही आजार असल्यास सकाळचे कोवळे ऊन घ्यावे.

 

* तज्ज्ञांच्या मते रोज थोडावेळ सूर्यप्रकाशात बसल्यास शरीराबरोबर तुमचा मेंदूही स्वस्थ राहतो.

 

* रोज सकाळी उन्हात बसल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल घटते, तसेच हृदयासंबधी आजारांचा धोका कमी होतो.

 

* सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्याने शरीरात मेलाटोनिन नावाचे हार्मोन तयार होते. यामुळे रात्री झोप न येण्याची किंवा अनिद्रेची समस्या दूर होते.

 

* थंडीमध्ये रोज उन्हात बसल्यास बॉडी मास इंडेक्स कमी होतो. त्यामुळे वजन घटण्यास मदत होते.

 

याचमुळे थंडीच्या दिवसात आजारपणापासून दूर राहण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात नियमितपणे १० ते १५ मिनिटे उभे राहावे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@