तुमचे इनकमिंग कॉल्स होणार बंद !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या टेलिकॉम क्षेत्रातील पदार्पणानंतर तगड्या स्पर्धेचा फटका बसलेल्या प्रस्थापित टेलिकॉम कंपन्या आता नवी धोरण आखण्याच्या तयारीत आहेत. रिलायन्सने दिलेली घसघशीत सुट आणि सेवा यांमुळे सर्वच टेलिकॉम कंपन्यांना याच स्पर्धेत उतरावे लागले, यात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी कंपन्यांनी आता इनकमिंग कॉल्सवरही शुल्क आकारण्याचा विचार केला आहे. त्यामुळे तुमचे इनकमिंग कॉल्स लवकरच बंद केले जाण्याची शक्यता आहे.

 

यासंबंधित अधिक माहिती तुमची सर्व्हिस प्रोवाईडर कंपनी तुम्हाला देईलच. मात्र, इनकमिंग कॉल्स सुरू ठेवण्यासाठी महिनाभरचा रिचार्ज तुम्हाला करावा लागू शकतो. रिलायन्स जिओशी स्पर्धा करताना खर्च झालेला महसूल व्होडाफोन-आयडीया आणि एअरटेल अशा प्रकारे वसूल करणार असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. टेलिकॉम कंपन्यांनी २८ रुपयांचा नवा प्लान सादर केला आहे. यात २८ दिवसांची वैधता असणार आहे. यात इनकमिंग कॉल्ससाठी शुल्क आकारावे लागणार आहे. कंपन्यांनी ३५ रुपये, ६५ रुपये आणि ९५ रुपयांपर्यंत टेरीफ आणले आहेत. हे रिचार्ज संपल्यानंतर सर्वात प्रथम आऊटगोईंग कॉल्स बंद होतील, त्यानंतर इनकमिंग सेवा बंद करण्यापूर्वी ग्राहकाला रिचार्ज करण्यासाठी वेळ दिला जाऊ शकतो.

 

केवळ इनकमिंग कॉल्ससाठी फोन वापरणाऱ्या ग्राहकांना आणि केवळ इनकमिंग कॉल्ससाठी फोन वापरणाऱ्या ग्राहकांमुळे मोठे नुकसान होत असल्याचे टेलिकॉम कंपन्यांचे म्हणणे आहे. व्होडाफोनच्या वरिष्ठ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्होडाफोन एका इनकमिंग कॉल्ससाठीचा टॅरिफ बाजारात आणण्याची तयारी करत आहे. ज्यात रिचार्ज केल्यापासून ४५ दिवसांपर्यंत सेवा सुरू राहणार आहे. मात्र, ४६व्या दिवशी पुन्हा रिचार्ज करावा लागेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@