बिनानी सिमेंटच्या खरेदीचा मार्ग मोकळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : देशातील अग्रगण्य सिमेंट कंपनी अल्ट्राटेकही बिनानी सिमेंट लिमिटेडची (बीसीएल) खरेदी करणार आहे. बीसीएलच्या खरेदीसाठी अल्ट्राटेकसिमेंटच्या सर्वसाधारण सभेत मान्यता मिळाली आहे. अल्ट्राटेकने बीसीएलचे राजस्थानमधील ६२५ दशलक्ष टन वार्षिक उत्पादन असलेले प्लांट खरेदी केले आहेत. या प्लांटची किंमत हजार २४ कोटी असल्याची माहिती कंपनीने दिली

 
बिनानीसिमेंटच्या बुडित कर्जांसमोर लिलावादरम्यान सर्वात जास्त बोली लावणारी कंपनी अल्ट्राटेक सिमेंटठरली होती. यानंतर कंपनी लवादाने १४ नोव्हेंबर रोजी अल्ट्राटेक सिमेंटला बिनानी सिमेंटच्या अधिग्रहणासाठी मंजूरी दिली होती. याविरोधात प्रतिस्पर्धी कंपनी दालमिया सिमेंटने (भारत) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कर्ज वितरकांची देयके देण्यात अल्ट्राटेक भेदभाव करत असल्याचा आरोप दालमिया समुहाने केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने दालमिया समुहाची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे कंपनीच्या अधिग्रहणाचा मार्ग मोकळा झाला. आदित्य बिर्ला समुहाच्या सोमवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही माहिती देण्यात आली.
 
या करारानंतर अल्ट्राटेकआणखी सक्षम झाली असल्याचा दावा कंपनीने केला असून अधिक कार्यक्षम बनल्याचा विश्वास त्यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे. बीसीएलचा सर्व कार्यभार सांभाळण्यास सुरुवात झाली असून यामुळे प्रतिस्पर्ध्यांना तगडे आव्हान देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या करारानंतर अल्ट्राटेकजगात चीन वगळता तिसरी सर्वाधिक सिमेंट उत्पादक बनणार आहे. बीसीएलच्या खरेदीनंतर महिन्याला १० कोटी टन सिमेंट उत्पादन होईल, असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@