पॅनकार्ड नियमांमध्ये झाले 'हे' बदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2018
Total Views |



मुंबई : आयकर विभागाने पॅन कार्डच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. याबाबत त्यांनी एक अधिसूचना जारी केली आहे. यानुसार एका आर्थिक वर्षात जर २.५ लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार करणाऱ्या लोकांकडे आता पॅनकार्ड असणे आवश्यक असणार आहे. यासाठी ३१ मेच्या आधी अर्ज करायचा आहे. खरेदी, विक्रीमधून मिळणारी रक्कम एक वर्षामध्ये ५ लाखाच्या वर असेल तर त्यांच्याकडे पॅनकार्ड असणे आवश्यक असणार आहे. आयकर विभागाला खरेदी-विक्री कर आकारात यावा यासाठी हा नियम बनवण्यात आला आहे.

 

आयकर विभागाने पॅनकार्डसाठी अर्ज करताना आई-वडिलांपासून वेगळं झाल्यानंतर वडिलांचं नाव लिहिण्याची अट रद्द केली आहे. आयकर विभागाने जरी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करताना अर्जदार आईचे नाव लावू शकतो. सध्या पॅनकार्डवरती अर्जदाराच्या नावाखाली वडिलांचे नाव असायचे. पण लग्नानंतर जर महिलेला आईचे नाव लावायचे असले तरी तसा अर्ज करु शकतो.

 

जर तुम्ही अर्ज केल्यानंतर पण कार्ड यायला उशीर होत असेल किंवा तुम्ही काही पॅनकार्डमध्ये काही बदलावं केला असेल तर तुम्ही ई-पॅनकार्डची सेवाही वापरू शकता. यासाठी कुठल्याही प्रकारचे वेगळे कागदपत्र लागणार नाही. ई-पॅनकार्ड जनरेट करण्यासाठी वेगळे पैसे आकारले जाणार नाही. https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या वेबसाइटवर जाऊन तुम्ही बदल करून ई-पॅनकार्ड जनरेट करू शकता. ही सुविधा ठराविक वेळेसाठी आहे, कालांतराने ही सुविधा बंद करण्यात येईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@