फेसबुकचे हे नवे फीचर्स पाहिलेत का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2018
Total Views |


 


सध्याची पिढी ही तंत्रज्ञानाच्या किती आहारी जाते हे वेगळे सांगायला नको. फेसबुक हा म्हणजे तरुणाईसोबतच सगळ्यांचा जिवाभावाचा विषय. हे सर्व बाबी लक्षात घेऊन फेसबुकने तुम्ही कितीवेळ फेसबुकवर वावरता हे सांगणारे एक नवीन फिचर आणले आहे. यासोबतच अजून बरेच फिचर फेसबुकने आणले आहेत.

 

Your Time On Facebook - युजरला एक ग्राफ दाखवतो, ज्यामध्ये तुम्ही कितीवेळ फेसबुकवर घालवता हे दाखवतो. या फीचरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला फेसबुकचे अँप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर सेटिंग आणि प्रायव्हसीमध्ये जावे लागेल. त्यानंतर तिथे Your Time On Facebook वरती क्लिक केल्यावर तिथे तुम्ही दिवसभर किती वेळ फेसबूकवरती घालवला हे समजेल.

 

याव्यतिरिक्त आणखीन काही फिचर फेसबुकने आणले आहेत. ते म्हणजे :-

 

जॉब्स (Jobs) - या फिचरचा वापर करून युजर्स स्वतःच्या लोकेशनच्या आसपास नोकरी शोधू शकतात. शहराबाहेरच्या नोकरीच्या संधी तर सगळीकडे दिसतात पण आसपासच्या संधी दिसू शकतात यामुळे हे फिचर विशेष ठरते.

 

सेव्ह पोस्ट (Save Post) - फेसबुकवर एखादी पोस्ट किंवा व्हिडीओ सेव्ह करून ठेवायचा असेल तर या फीचरच्या माध्यमातून तसे करता येते.

 

रक्तदान (Blood Donations) - अत्यंत उपयोगी असे हे फीचर आहे. एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास या फीचरच्या माध्यमातून ब्लड डोनर्सची माहिती मिळते.

 

लाइव्ह व्हिडिओ (Live Videos) - या फीचरच्या माध्यमातून लाईव्ह सुरू असलेले सगळे व्हिडीओ एकाच ठिकाणी पाहता येतात.

 

हवामान (Weather) - या फिचरच्या माध्यमातून हवामानाबाबत माहिती आणि तुमच्या लोकेशनच्या तापमानाची ताजी माहिती मिळते. येणाऱ्या काळात हवामान कसे असणार आहे याबाबतही माहिती मिळते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@