इन्स्टाग्राममध्ये होणार ‘हा’ बदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2018
Total Views |

 


 
 
 
नवी दिल्ली : इन्स्टाग्रामचे रुपडे आता पालटणार आहे. इन्स्टाग्राम आपल्या यूजर्ससाठी एक नवीन बदल घेऊन येत आहे. हा बदल इन्स्टाग्रामच्या यूजर्स प्रोफाईलमध्ये होणार असून प्रोफाइलच्या लेआऊट्सची टेस्टिंग सध्या चालू आहे. इन्स्टाग्रामच्या प्रोपाइल्समध्ये आयकॉन, बटन आणि नेव्हिगेशन टॅब्सचा समावेश असणार आहे.
 

इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या आता वरती टॉपला दिसणार नाही. फॉलोअर्सची संख्या छोट्या अक्षरात दिसेल. या नवीन बदलांमुळे यूजर्सना आता आणखी जास्त चांगल्यारित्या व्यक्त होण्याची संधी मिळेल. यूजर्सना ज्यांची पोस्ट पाहायची आहे त्यांच्याशी यूजर्स अधिक चांगल्यारित्या जोडले जातील. फॉलो आणि मॅसेज बटन हे एकमेकांच्याबाजूला असतील. एखाद्या यूजर्सच्या फॉलोइंग टॅबवर क्लिक केल्यास म्युचअल फॉलोअर्स दिसतील. ग्रिड, पोस्ट्स आणि टॅग्ड फोटोज आइकॉन्सच्या स्वरुपात दिसतील.

 

 
 

आयजीटीव्हीसाठी एक स्वतंत्र टॅब असेल. बिझनेस अकाऊंट्ससाठी एक वेगळा शॉप टॅब असेल. तसेच आणखी काही बटन्सही असतील. डायरेक्शन, कॉल आणि स्टार्ट ऑर्डर ही बटनही असतील. सध्या इन्स्टाग्राम या बदलांवर काम करत आहे. पुढील आठवड्यात इन्स्टाग्रामची टेस्टिंग घेण्यात येईल. इन्स्टाग्राम नेहमी फीडबॅकच्या आधारावर प्रोफाइसमध्ये नवीन प्रयोग करतच असते. जेणेकरून यूजर्सना उत्तम अनुभव मिळू शकेल. अशी माहिती इन्स्टाग्राम कंपनीद्वारे देण्यात आली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@