बंगळुरूत मिळतो सर्वाधिक पगार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2018
Total Views |

 


 
 
 
बंगळुरू : ‘लिंक्डइन’ या कंपनीने प्रथमच संपूर्ण भारतभर वेतनासंदर्भात एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक पगार हा देशातील बंगळुरू शहरात दिला जातो. अशी माहिती समोर आली आहे. हार्डवेअर आणि अँड नेटवर्किंग, सॉफ्टवेअर अँड आयटी सर्विसेस, तसेच कन्झ्युमर सेक्टर या क्षेत्रातील अनेक कंपन्या बंगळुरूमध्ये आहेत. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार दिला जातो. त्यामुळे देशातील सर्वाधिक पगार बंगळुरूमधील कर्मचाऱ्याना दिला जातो. हे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
 

सर्वाधिक पगाराच्या बाबतीत या सर्वेक्षणानुसार मुंबई दुसऱ्या स्थानी आहे. तर दिल्लीचा तिसरा क्रमांक लागतो. हैदराबाद हे शहर याबाबतीत चौथ्या स्थानी आहे आणि चेन्नई पाचव्या स्थानी आहे. बंगळुरू या शहराची आयटी हब अशी ओळख आहे. हार्डवेअर अँड नेटवर्किंग क्षेत्रातील कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बंगळुरूमध्ये १५ लाख रुपये वार्षिक पगार दिला जातो. सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १२ लाख रुपये वार्षिक वेतन मिळते. तर कन्झ्युमर क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना ९ लाख रुपये वार्षिक वेतन दिले जाते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@