आयटी शेअरच्या घसरणीने बाजारात दबाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2018
Total Views |
 

मुंबई : डॉलरसमोर रुपया मजबूत झाल्याने बुधवारी आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. याचे पडसाद दोन्ही निर्देशांकांवर उमटले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २७४.७१ अंशांनी घसरुन ३५ हजार १९९.८०च्या स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५६.१५ अंशांच्या घसरणीसह १० हजार ६०० वर बंद झाला. टीसीएस, विप्रो, इन्फोसिस आदी आयटी कंपन्यांचे शेअर घसरले.

 

मंगळवारी रुपया दोन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याने दुसऱ्या दिवशी आयटी कंपन्यांच्या शेअरची चौफेर विक्री झाली. निफ्टीच्या मंचावर टीसीएस ३.४७ टक्के, इन्फोसिस ३.४१ टक्के, टेक महिंद्रा २.५४ टक्के, निट टेक २.४९ टक्के आणि विप्रो ३ टक्क्यांनी घसरला. शेअर बाजारातील अन्य आयटी कंपन्यांच्या शेअरमध्येही घसरण झाली. मंगळवारी रुपया २१ पैशांनी मजबूत होऊन डॉलरच्या तुलनेत ७१.४६ वर कामगिरी करत होता.

 

डॉ. रेड्डीजच्या शेअरमध्ये ६.५० टक्क्यांनी वाढ झाली. अमेरिकेतील इंडिविवोअर कंपनीने पेटंट उल्लंघन केल्याप्रकरणीच्या दाव्याचा निकाल डॉ. रेड्डीजच्या बाजूने लागला आहे. या वृत्तानंतर बुधवारी डॉ. रेड्डीजचा शेअर ८ टक्क्यांनी वधारला. दिवसअखेर तो ५.९० टक्क्यांनी मजबूत होऊन २ हजार ६०० रुपयांवर बंद झाला

.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@