धर्मग्रंथाचा अवमान, अक्षयकुमारची चौकशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2018
Total Views |



 
 
 
चंदीगड : ‘गुरु ग्रंथ साहिब’ या शीख धर्मीयांच्या पवित्र धर्मग्रंथाचा अवमान केल्याप्रकरणी पंजाब एसआयटीने अभिनेता अक्षयकुमार याची चौकशी केली. ही चौकशी तब्बल दोन तास करण्यात आली. या चौकशीदरम्यान तब्बल ४२ प्रश्नांचा भडिमार अक्षयवर करण्यात आला. ‘मॅसेंजर ऑफ गॉड’ हा सिनेमा २०१५ च्या सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम सिंह यांची या सिनेमात प्रमुख भूमिका होती. या सिनेमात शीखांचा धर्मग्रंथ गुरु ग्रंथसाहिबचा अपमान झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता.
 
याप्रकरणी बाबा राम रहीम याची निर्दोष सुटका झाली होती. परंतु पंजाबमध्ये सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध होता. या विरोधाला न जुमानता हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. रामरहीम आणि पंजाबचे तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही बैठक अभिनेता अक्षयकुमारच्या घरी घेण्यात आली. असा आरोप अक्षयवर आहे. याप्रकरणी अक्षयकुमार, रामरहीम आणि सुखबीरसिंह बादल यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
 

याप्रकरणी सुखबीरसिंह बादल आणि अक्षयकुमारला चौकशीसाठी एसआयटीने बोलावले होते. त्यानुसार अक्षय हजर झाला. एसआयटीच्या अधिरकाऱ्यांनी अक्षयकुमारला राम रहीम यांच्या भेटीविषयी प्रश्न विचारले. राम रहीमसोबत तुमची ओळख कशी झाली? कुठे झाली? असे प्रश्न अक्षयला विचारण्यात आले. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु “राम रहीमला आपण कधीही भेटलो नाही.” असे अक्षयचे म्हणणे आहे. तसेच “मला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले आहे.” असेही अक्षयने म्हटले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@