तुकाराम मुंढे यांची बदली?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2018
Total Views |

 


 
 
 

समाजमाध्यमांमधून चर्चांना उधाण

 

नाशिक : नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याची चर्चा बुधवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी समाजमाध्यमांवर पसरली होती. मात्र, मुंढे यांच्या बदलीबद्दल कोणतेही अधिकृत वृत्त नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, अधिवेशन काळात बदली होत नसल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे मुंढे यांच्या बदलीचे वृत्त हे अफवा आहे किंवा यात काही सत्य आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

 

या प्रकरणी समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या संदेशांत अश्विनी जोशी, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचेही सांगण्यात येत आहे. आयुक्त पद एक असताना दोन नावे चर्चेत येत असल्याने अधिकच संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले. काल दि. २१ नोव्हेंबर रोजी महापालिकेला ईदनिमित्त सुट्टी असल्याने महापालिका वर्तुळातून कोणतेही वृत्त समोर आलेले नाही. तसेच, महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनीही या वृत्ताची पुष्टी केलेली नाही. तरीही अशा प्रकारच्या संदेशाने चर्चेला मात्र उधाण आल्याचे दिसून आले. यासंदर्भात राज्य शासनातील सूत्रांशी संपर्क साधला असता, त्यांनीही या वृत्ताची पुष्टी केली नाही. तसेच काल दि. २१ नोव्हेंबर रोजी ईदनिमित्त शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने अशा प्रकारचा कोणताही शासकीय निर्णय निर्गमित करण्यात आला नसल्याचे शासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच, बदलीच्या वृत्ताबाबत मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही.

 

आठ महिन्यांपूर्वीच स्वीकारला कार्यभार

 

सुमारे आठ महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. तेव्हापासून त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. तसेच, महापालिका नगरसेवक व कर्मचारी यांच्याकडून मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्यात आल्याने मुंढे यांची नाशिकमधील कारकीर्द कायमच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. त्यांनी राबविलेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमास नाशिककर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. तसेच, एनएमसी इ कनेक्ट अॅपच्या माध्यमातून नागरिकांच्या महापालिकेशी संबंधित असणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यात येत आहे. ही सुविधा नाशिकमध्ये लोकप्रिय ठरली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@