बावखळेश्वर मंदिरावर कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2018
Total Views |
 
 
नवी मुंबई : बावखळेश्वर मंदिरावर बुधवारी अतिक्रमणविरोधी पथकाने दिवसभर गुप्तता पाळत कारवाई केली. नेमकी किती कारवाई केली हे गुलदस्त्यात ठेवले. मात्र, या कारवाईमुळे पूर्ण एमआयडीसीला संचारबंदीचे स्वरूप आले आहे. पोलीस आयुक्तालयामधले सुमारे अर्धे मनुष्यबळ याच बंदोबस्तात तैनात करण्यात आले होते.
 

पावणे एमआयडीसीसह शहरातही ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एमआयडीसीत बांधण्यात आलेल्या बावखळेश्वर मंदिरावर मंगळवारी सकाळपासून कारवाई करण्यास सुरुवात केली होती. त्यापूर्वी येथील मूर्ती हलवण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून एमआयडीसी प्रशासन आणि पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे.

 

मंदिराला जाणार्‍या सर्व रस्त्यांवर पोलीस तैनात करण्यात आले असून कुणालाही या रस्त्यावर सोडले जात नाही. या परिसरातील ज्या कंपनीत काम करणारे आहेत त्यांचे ओळखपत्रानुसार आत सोडण्यात येत होते. ठाणे-बेलापूर रस्त्यावरून एमआयडीसीकडे जाणार्‍या सर्व रस्त्यांच्या प्रवेशाला चौकीचे स्वरूप आले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@