अभिजित बोस ‘व्हॉटस्अॅप इंडिया’चे सीईओ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2018
Total Views |
  

नवी दिल्ली : सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉटस्अॅपने अखेर केंद्र सरकारच्या मागणीढे नमते घेत भारतातील मुख्यालयासाठी अध्यक्ष म्हणून अभिजित बोस यांची निवड केली आहे. व्हॉटस्अपवर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या आणि अफवा रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी माहीती तंत्रज्ञान मंत्रालयाने केली होती. व्हॉटस्अप इनकोर्पोरेशनने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, अभिजित बोस हे पुढच्या वर्षी कंपनीत रुजू होणार आहे.

 

सध्या कॅलिफोर्नियातील मुख्यालयातून कारभार करणारी फेसबुकची उपकंपनी व्हॉटस्अप इनकॉर्पोरेशनचे गुरुग्राममध्ये भारतातील मुख्यालय बनणार आहे. नवनियुक्त कर्मचारी व्हॉटस्अॅप इंडियाचा कारभार सांभाळतील. व्हॉटस्अॅपचे सीओओ मॅट इदेमा म्हणाले कि, भारतात सेवा देण्यासाठी आम्ही पूर्णतः कटीबद्ध आहोत. डिजिटल इंडियाच्या पार्श्वभूमीवर सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. अभिजित बोस यांच्या अनुभवाचा फायदा भारतातील व्यवसाय विस्ताराला होईल.

 

केंद्र सरकारने गेल्या काही काळात जमावांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पसरवल्या जाणाऱ्या अफवा रोखण्यासाठी फेसबूक आणि व्हॉटस्अॅपला उपाययोजना करण्यास सांगितले होते. त्यानुसार व्हॉटस्अॅपने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. बोस हे ईझटॅप या कंपनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक आहेत. ईझटॅप हे -पेमेंटची सेवा देणारे पोर्टल आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
@@AUTHORINFO_V1@@