मुस्लिमच काँग्रेसची 'व्होट बँक'; काँग्रेस नेत्याचा दावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2018
Total Views |



नवी दिल्ली : मध्यप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी मुस्लिम मतदारांविषयी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. मुस्लिम मतदार हे काँग्रेसचे व्होट बँकअसल्याचे कमलनाथ यांनी म्हटले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. कमलनाथ यांच्या या व्हिडिओमुळे मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

या व्हिडिओमध्ये कमलनाथ म्हणातात, "ज्या भागात मुस्लिमांची संख्या जास्त आहे. त्या ठिकाण किती टक्के मतदान झाले याच्या नोंदी तुम्ही तपासून घ्या. इंटरनेटवर तुम्हाला हे सहजासहजी मिळून जाईल. या भागात ६० टक्के मतदान झालं तर का झालं? ९० टक्के मतदान का झालं नाही? याची चौकशी करा. मुस्लिम भागात ९० टक्के मतदान नाही झाले तर आपले खूप मोठे नुकसान होऊ शकते."

कमलनाथ यांच्या या वक्तव्यावर मध्यप्रदेश बीजेपीचे नेते प्रभात झा यांनी पलटवार केला आहे. त्यांनी कमलनाथ यांच्यावर मुस्लिमांना भडकवण्याचा आरोप केला आहे. "मध्यप्रदेश राज्य शांततेसाठी ओळखलं जातं. निवडणुकीदरम्यान इथे कधीही दंगे किंवा वादावादी झाली नाही. त्यामुळेच कि काय कमलनाथ हे धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुकींमध्ये अडथळा आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत." असे असा आरोप करत झा यांनी कमलनाथ यांच्या अटकेची मागणी केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@