सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निवड करणे ही समस्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2018
Total Views |



पणजी : "भारतातील प्रादेशिक चित्रपटांचा विकास अचंबित करणारा असून हे चित्रपट मोठा पल्ला गाठत आहे, लवकरच आता दिवस येईल की प्रादेशिक चित्रपट असा वेगळा विभाग राहणार नाही. सर्व चित्रपट एकाच विभागांतर्गत गणले जातील." असे ४९व्या इफ्फी महोत्सवातील इंडियन पॅनोरमा ज्युरी-मंडळाचे अध्यक्ष राहुल रवैल यांनी सांगितले. ते पणजी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. ४९वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पणजी गोवा येथे होणार आहे.

 

इंडियन पॅनोरमात विविध विषयांवरील चित्रपटांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये लडाख, लक्षद्वीपमध्ये चित्रित झालेल्या तसेच तुळू आणि आसाम भाषेतील चित्रपटांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. १०० चित्रपटांच्या यादीतून २२ चित्रपटांची निवड करणे हे मोठे आव्हान असे रवैल यांनी सांगितले. इंडियन पॅनोरमा विभागात निवड झालेले चित्रपट जागतिक मंचावर भारताचे यथार्थ दर्शन घडवण्यासाठी पूर्णत: पात्र असल्याचे ते म्हणाले. ज्युरींपुढे येणाऱ्या सर्वच चित्रपटांकडे भारतीय चित्रपट म्हणूनच पाहिले जाते असेही रवैल यांनी स्पष्ट केले. इंडियन पॅनोरमामधील वगळलेल्या काही चित्रपटांमधून निर्माण झालेला विवाद दुर्दैवी असल्याचे सांगून निर्णय घेण्यासाठी ज्युरींना पूर्णत: स्वायत्तता देण्यात आली होती असे त्यांनी सांगितले.

 

"डिजिटल तंत्रज्ञानाच्या आगमनाबरोबरच अनोखा आशय असलेले लघुपट मोठ्या संख्येने तयार होऊ लागले आहेत. मात्र चित्रपट निर्मात्यांसमोर गुणवत्तेची खात्री पटवून देण्याचे मोठे आव्हान आहे. लोकांची एकाग्रता कमी होत असल्याने कथाधारित चित्रपटांची जागा लघुपट घेत आहेत. चित्रपट निर्मितीत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी लघुपट हे अतिशय उपयुक्त ठरत आहे." असे कथाबाह्य चित्रपट विभागाच्या ज्युरींचे अध्यक्ष विनोद गणात्रा यांनी सांगितले. ज्युरी सदस्य मेजर रवी आणि के. जी. सुरेश यावेळी उपस्थित होते. यावेळी इंडियन पॅनोरमा-कथाबाह्य विभागाच्या ज्युरीचे अध्यक्ष विनोद गणात्रा तसेच पार्वती मेनन आणि सुनील पुराणिक हे ज्युरी सदस्यही उपस्थित होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@