पंजाबमधील स्फोटामागे आयएसआयचा हात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2018
Total Views |

 


 
 
 
चंदीगढ : अमृतसर येथील निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामागे पाकिस्तानच्या आयएसआयचा हात असल्याचे समोर आले आहे. या स्फोटातील आरोपीचा शोध घेऊन त्याला अवघ्या ७२ तासांमध्ये अटक करण्यात आली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली.
 

हा ग्रेनेड हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव विक्रमजित सिंग आहे. तो धालीवाल गावातील रहिवासी आहे. दुसऱ्या आरोपीचे नाव अवतार सिंग आहे. लवकरच त्यालादेखील अटक करण्यात येईल. असे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या ग्रेनेड हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल ही जप्त करण्यात आली आहे. या हल्ल्यात वापरण्यात आलेला ग्रेनेड हा पाकिस्तानातील फॅक्ट्रीमध्ये बनवलेला असल्याचे समोर आले आहे. या ग्रेनेडचे लायसन्स पाकिस्तानमधील ऑर्डिनन्स फॅक्ट्रीकडे आहे. काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर हल्ला करण्यासाठी ज्याप्रकारचे ग्रेनेड वापरण्यात आले होते. त्याच प्रकारचे हे ग्रेनेड होते. असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले.

 

निरंकारी भवनावर झालेला ग्रेनेड हल्ला हा दहशतवादी हल्ला होता. त्याचे धर्माशी काहीही देणेघेणे नाही. निरंकारी भवनमध्ये भाविकांची नेहमीच गर्दी असते. गर्दीचे ठिकाण म्हणून या निरंकारी भवनावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. असे अमरिंदर सिंग यांनी सांगितले. हा दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तान आणि आयएसआयला त्यांच्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ. असे अमरिंदर सिंग म्हणाले. तसेच या दहशतवादी हल्ल्यामागे खलिस्तानी लिबरेशन फोर्सचादेखील हात असल्याचे त्यांनी सांगितले.

 
खलिस्तानी दहशतवादी हरमीत सिंह हॅप्पी उर्फ पीएचडी हा या हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. सध्या हा मास्टरमाइंड पाकिस्तानात लपून बसला आहे. त्याने अमृतसर येथील स्थानिक तरुणांच्या माध्यमातून हा हल्ला घडवून आणला. अशी माहिती सूत्रांनी दिली. आम्ही मॉड्यूल १७ चा पर्दाफाश केला. एकूण ८१ लोकांना याप्रकरणी अटक करण्यात आली. ७७ शस्त्रे जप्त करण्यात आली असून त्यात आयडीएस, ग्रेनेडही जप्त करण्यात आले आहेत. आपली सुरक्षा यंत्रणा ही दहशतवाद्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे. असा विश्वास पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केला.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@