युद्धनौकाबांधणीसाठी भारत-रशिया करार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2018
Total Views |


 


५० कोटी रुपयांच्या करारात होणार दोन युद्धनौकाबांधणी


नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांनी गोव्यातील नौदल गोदीत युद्धनौकाबांधणीसाठी ५० कोटी रुपयांचा करार केला आहे. या करारानुसार रशिया भारताला दोन युद्धनौकाबांधणीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सामग्री पुरवणार आहे. भारत आणि रशिया यांच्यात एस ४०० करारानंतरचा हा सर्वात मोठा करार असल्याचे देखील सांगितले जाते.

 

भारताने रशियाकडून शस्र खरेदी करू नये यासाठी अमेरिकेकडून दबाव आणला जात होता. या दबावाला झुगारून भारताने रशियासोबत गेल्या दोन महिन्यात दोन मोठे करार केले आहेत. गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) आणि रशियाची रोझोबोरॉनएक्स्पोर्ट यांच्यात हा करारात झाला. या युद्धनौका फ्रिगेट प्रकारच्या असून यावर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि अत्याधुनिक दर्जाची शस्त्रास्त्रे बसवण्यात येतील. हा करार भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढविणारा असल्याचे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

"भारत आणि रशिया यांच्यात ५० कोटी रुपयांचा करार झाला असून रशिया भारताला दोन युद्धनौकांच्या निर्मितीला मदत करणार आहे. अत्याधुनिक तंत्राद्यानाने बनवलेल्या या युद्धनौका सोनार व रडार वर दिसणार नाहीत. या नौकांच्या बांधणीला २०२० मध्ये सुरुवात होईल. त्यातील पहिली युद्धनौका २०२६ साली आणि दुसरी नौका २०२७ साली तयार होईल." असे जीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक शेखर मित्तल यांनी या कराराविषयी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@