एका लग्नाची 'हाऊसफुल्ल' गोष्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2018
Total Views |



मुंबई : 'आरण्यक' 'अलबत्या गलबत्या' आणि 'हॅम्लेट' यांसारख्या नाटकांची निर्मिती केल्यानंतर अजून एक जुने दर्जेदार नाटक झी मराठीने रंगभूमीवर उतरवण्याचे ठरवले. ते म्हणजे 'एका लग्नाची पुढची गोष्ट'. १७ नोव्हेंबरला या नाटकाचा शुभारंभ झाला. अद्वैत दादरकर याने या नाटकाचे लिखाण आणि दिग्दर्शन केले आहे. 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकाचा हा पुढचा भाग आहे. सध्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकांचे प्रयोग हाउसफुल्ल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

 

प्रशांत दामले आणि कविता लाड ही रंगभूमीवरची सुप्रसिद्ध जोडी. एका लग्नाची गोष्ट या नाटकाने मराठी नाटक क्षेत्रात अनेक इतिहास रचले. कालांतराने कविता लाड- मेढेकर यांनी नाटकातून काहीकाळ ब्रेक घेतला होता. त्यांनी छोट्या पडद्यावर काम चालू ठेवले होते. तर दुसरीकडे प्रशांत दामले सातत्याने नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. ही जोडी पुन्हा एकत्र येईल की नाही याची उत्सुकता सर्वांचा होती. अखेर हा योग्य जुळून आला. बऱ्याच वर्षानंतर प्रशांत-कविता आणि 'एका लग्नाची...' याचे समीकरण पाहून नाट्यप्रेमी सुखावले आहेत. त्यात हाउसफुल्लच्या बोर्डाने या समीकरणाला चारचाँद लावले आहेत.

 

'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाच्या व्यवस्थापकांनी सांगितले की, " या नाटकाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. १७ नोव्हेंबरपासून हे नाटक सुरु झाले. त्यानंतर याचे रोज दोन दोन प्रयोग लागत आहेत आणि ते सर्व प्रयोग हाऊसफुल्ल गेले आहेत. यानंतरचे २२,२३, आणि २४चे काही प्रयोग हाऊसफुल्ल आहेत." अलीकडे सिनेमा आणि नाटकांची लांबी ही जास्तीत जास्त २ ते २.३० तास एवढीच असते. पण लोकांचा टाळ्या आणि वन्स मोर पाहता हे ३ तासांचे नाटक आता ३.३० एवढे चालत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@