दै. ‘मुंबई तरूण भारत’द्वारा आयोजित ‘शहरी माओवादाचे संकट’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2018
Total Views |

 

 

 
 

नाशिकमध्ये कॅ. स्मिता गायकवाड यांचे व्याख्यान

 

नाशिक : राष्ट्रीय विचारांशी बांधिलकी असणाऱ्या दै. मुंबई तरूण भारततर्फे वाचकांना विचारशील व उपक्रमशील करणारे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. याच संकल्पनेतून सध्या नव्याने चर्चेत आलेल्या शहरी माओवादाचे संकटया विषयावर नाशिक येथे कॅ. स्मिता गायकवाड यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी नाशिक येथील म. वि. प्र. संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृह येथे सायंकाळी ६.३० वाजता हे व्याख्यान होणार आहे.

 

कॅ. स्मिता गायकवाड या शहरी माओवादाच्या अभ्यासक म्हणून परिचित असून या विषयावर त्यांनी सखोल संशोधन, अभ्यास, लेखन व देशभर प्रवास केला आहे. माओची रणनीती काय होती, शहरी माओवाद कसा पसरत आहे, त्याचे नेमके वास्तव काय आहे, आदी असंख्य मुद्द्यांवर स्मिता गायकवाड या नाशिककरांशी संवाद साधणार आहेत. दै. मुंबई तरूण भारतच्या या विशेष कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक ग्रामीण जिल्हा संघचालक डॉ. मधुकर आचार्य हेदेखील उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानाचा विषय हा सामाजिकदृष्ट्या व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील असल्याने नाशिककर नागरिकांनी मोठ्या संख्येने या व्याख्यानास उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय विचार दर्शनचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, मुंबई तरूण भारतचे संपादक किरण शेलार व व्यवसाय प्रमुख रविराज बावडेकर यांनी केले आहे. तसेच, या कार्यक्रमासंबंधी अधिक माहितीसाठी प्रवर देशपांडे (भ्रमणध्वनी : ७०६६७४४५७२) किंवा शिरीष सोनवणे (भ्रमणध्वनी : ९८९०९२१४८५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@