शेअर बाजारावर जागतिक घडामोडींचे सावट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018
Total Views |
 

मुंबई : अमेरिका आणि आशियातील शेअर बाजारांतील पडझडीची झळ मंगळवारी दोन्ही निर्देशांकांना बसली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तिनशे अंशानी घसरुन ३५ हजार ४७५ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०७ अंशांनी घसरुन १० हजार ६५६ अंशांवर घसरला. निफ्टीच्या मंचावर येस बॅंकेचा शेअर ६ टक्क्यांनी घसरला.

 

बुधवारी गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीमुळे मोठ्या शेअरमध्येही घसरण झाली. रिलायन्सचा शेअर १ टक्क्यांनी घसरुन ११३८.६५ रुपयांवर पोहोचला. टीसीएस १.२८ टक्क्यांनी घसरत १८७७.७५ रुपयांवर बंद झाला. येस बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आर. चंद्रशेखर यांच्या राजीनाम्यामुळे बॅंकेच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली असून तो १९२.५० च्या स्तरावर बंद झाला. हिंडाल्को सहा टक्के, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स ३.७९ टक्के, डॉ. रेड्डी लॅब ३.५७ टक्के, विप्रो ३.९२ टक्क्यांनी घसरले. निफ्टीमध्ये गेल इंडियाचा २.७९ टक्क्यांनी वधारुन सर्वाधिक उच्चांकीचा शेअर ठरला. अदानी पोर्ट, इंडसइंड बॅंक, बजाज फायनान्स आदी शेअर वधारले.

 

पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये घट

 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घसरणीचे सत्र सुरूच आहे. सोमवारी पेट्रोलच्या किमतीत १९ आणि डिझेलमध्ये १२ पैसे प्रतिलिटरने घट झाली. नवी दिल्लीत पेट्रोल ७६.५२ रुपये तर डिझेल ७१.३९ रुपये होते. मुंबईत पेट्रोल १९ पैशांनी घसरुन ८२.०४ रुपये तर डिझेल १२ पैशांनी स्वस्त होऊन ७४.७९ रुपयांवर पोहोचले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@