जगातील सर्वात उंच शिवमूर्ती भारतात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018
Total Views |

 


 
 
 
श्रीनाथद्वारा : राजस्थानच्या उदयपूरमधील श्रीनाथद्वारा येथे भगवान शंकराची उंच अशी शिवमूर्ती उभारण्यात येत आहे. ही शिवमूर्तीची ची ३५१ फूट असणार आहे. जगातील ही सर्वांत उंच शिवमूर्ती असेल. सध्या या शिवमूर्तीचे बांधकाम हे अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ते पूर्ण होईल. २०१९ च्या मार्च महिन्यामध्ये या शिवमूर्तीचे अनावरण केले जाईल.
 
 

 
 

भगवान शंकराच्या जगभरात उंच मूर्ती आहेत. सध्या नेपाळमधील कैलाशनाथ मंदिरातील शिवमूर्ती ही १४३ फूटांची असून ती जगातील सर्वात उंच शिवमूर्ती आहे. परंतु भारतात राजस्थानमध्ये उभारली जात असलेली ही मूर्ती जगातील सर्वात उंच शिवमूर्ती असणार आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार असे कळते की मिराज ग्रुप ही शिवमूर्ती तयार करत आहे. ही शिवमूर्ती तयार करण्यासाठी तब्बल ३ हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. या शिवमूर्तीचे वजन ३० हजार टन असणार आहे. या शिवमूर्तीच्या हातात असलेल्या त्रिशूळाची उंच ३१५ फूट उंच आहे. या शिवमूर्तीमध्ये चार लिफ्ट तयार करण्यात आल्या आहेत. २८० फूट उंचीपर्यंत पर्यटकांना जाता येईल अशी सोय करण्यात आली आहे.

 

  • जगभरातील उंच शिवमूर्ती
     
  • कैलासनाथ मंदिर, नेपाळ – १४३ फूट

  • मुरुदेश्वर मंदिर, कर्नाटक – १२३ फूट

  • आदियोग मंदिर, तामिळनाडू – ११२ फूट

  • मंगल महादेव, मॉरिशिस – १०८ फूट

 

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@