भारतमातेपेक्षा सोनिया-राहुल गांधी काँग्रेसला वाटतात महान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018
Total Views |

 


 
 
 

राजस्थानमधील प्रकार उघडकीस

 

जयपूर : काँग्रेस पक्षामध्ये नेहरु-गांधी कुटुंबियांपेक्षा कोणीही मोठे नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून भाजप व काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. भाजपने याच पार्श्वभूमीवर एक ध्वनीचित्रफित प्रसारित केली असून त्यात भारत माता की जयघोषणा देणार्‍या कार्यकर्त्याला रोखण्यात आल्याचे दिसत आहे.

 

सदर कार्यकर्ता भारत माता की जयही घोषणा देत असतानाच त्याला थांबवून बी. डी. कल्ला या स्थानिक काँग्रेस नेत्याकडून नंतर गांधी कुटुंबियांच्या घोषणा देण्यास सांगण्यात आले. असे सांगितल्यानंतर मंचावरील या कार्यकर्त्यालाही चांगलाच जोर चढला व त्याने भारत माता की जय ऐवजी सोनिया गांधी झिंदाबाद’, ‘राहुल गांधी झिंदाबाद’, ‘अहमद पटेल झिंदाबाद’, ‘सचिन पायलट झिंदाबाद’, ‘अशोक गहलोत झिंदाबादअशा घोषणा दिल्या.

 
 
 
 

सदर ध्वनिचित्रफितीत ही बाब प्रत्यक्ष दिसत असून काँग्रेसला भारत माता की जयपेक्षा गांधी कुटुंबिय आणि स्वतःच्या नेत्यांच्या घोषणा सर्वतोपरी आहेत का, असा सवाल विचारला जातोय. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर बी. डी. कल्ला यांचा माळी समाजाकडून निषेध नोंदवण्यात आला. तसेच त्यांच्या पुतळ्याला चोपही दिला गेला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@